मंगेश बोरगावकरच्या `एकसारखे ....', गाण्याला मिळतोय प्रेक्षकांच्या उस्फुर्त प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 18:22 IST2023-08-03T18:14:58+5:302023-08-03T18:22:14+5:30
या गाण्याच्या निमित्ताने गायक मंगेश बोरगावकर आपल्या सर्वांच्या समोर दिग्दर्शकाच्या भूमिकेत आला आहे.

मंगेश बोरगावकरच्या `एकसारखे ....', गाण्याला मिळतोय प्रेक्षकांच्या उस्फुर्त प्रतिसाद
एक प्रयोगशील युवा गायक अशी मंगेश बोरगावकरची ओळख आजही कायम आहे. तर मंगेश आपल्या सर्वांना आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. ही नवीन भूमिका आहे, दिग्दर्शनाची. त्याचे निमित्त आहे सई टेंभेकर या सांगीतवेड्या मुलीने लिहिलेले आणि संगीतबद्ध केलेलं एकसारखे '.... फॉर एव्हर अँड अ डे!' हे डुएट गाणे. या गाण्याच्या दिग्दर्शनाबरोबरीने सई टेंभेकरसबोत त्याने गाणे गायलेही आहे. या गाण्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या गाण्याचे लेखन आणि संगीत दिग्दर्शन सईने केले आहे."
या गाण्याविषयी मंगेश सांगतो, "एकमेकांवर प्रेम करणाऱ्या दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्यांचे नाते हे एकरुप झालेले असते. ह्या व्यक्ती एकमेकांची मनापासून काळजी घेतात. त्यांच्यातील प्रेम हे अनंताच्या पातळीवर असते. जीवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तींची मानसिकता म्हणजे एकसारखे '.... फॉर एव्हर अँड अ डे! ' हे गाणं. गाणं अजिबातच कंटाळवाणे माही. उलट त्याचे शब्द सहजतेने आपल्या ओठी राहतील असे गाणे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे गाणे आजच्या तरुणाईला भावेल, पटेल रुचेल अशा शब्दांत सईने लिहिले आहे. "
एकसारखे '.... फॉर एव्हर अँड अ डे! 'च्या निमित्ताने गायक मंगेश बोरगावकर आपल्या सर्वांच्या समोर दिग्दर्शकाच्या भूमिकेत येणार आहे. या नव्या भूमिकेविषयी मंगेश सांगतो, " नवी आवाहने पेलायला कोणाला आवडत नाही? याला मीही अपवाद नाही. तर मीहीहे दिग्दर्शकाचे आवाहन स्वीकारले आणि लीलया पेलले. गायक असल्यामुळे तसेच गाणे स्वतः गायल्यामुळेगाण्याचे विडिओ दिग्दर्शन करणे अतिशय सोपे गेले. गाण्याचे लोकेशन्स स्वतः निवडली. एकंदरीत हा अनुनभव माझ्यासाठी अतिशय चांगला आहे. पुण्याच्या जवळच्या सुंदर निसर्गरम्य अशा ठिकाणी या गाण्याची म्युझिक विडिओ शूट केला आहे. राज पाटील, अथर्व गई व सुशांत सविलाके यांचे कॅमेरा वर्कही उत्तम झाले आहे. "