सिध्दार्थचा दे धक्का आता, हिंदीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2016 13:26 IST2016-07-29T07:56:51+5:302016-07-29T13:26:51+5:30
मराठी चित्रपटसृष्टी यश पाहता, बॉलीवुडचे अनेक कलाकार, निर्माते, दिग्दर्शक मराठी इंडस्ट्रीकडे वळू लागले आहेत. पण आता, चक्क सिध्दार्थ जाधवचा ...

सिध्दार्थचा दे धक्का आता, हिंदीत
म ाठी चित्रपटसृष्टी यश पाहता, बॉलीवुडचे अनेक कलाकार, निर्माते, दिग्दर्शक मराठी इंडस्ट्रीकडे वळू लागले आहेत. पण आता, चक्क सिध्दार्थ जाधवचा सुपरहिट चित्रपट दे धक्का या चित्रपटाचा रिमेक हिंदीमध्ये येणार आहे. या हिंदी चित्रपटात अभिनेता संजय दत्त प्रमुख भूमिका साकारणार आहे. हिंदीमधील दे धक्का चित्रपटाच्या नावाचा अजून खुलासा करण्यात आलेला नाही. पण ओमुंग कुमार आणि संदिप सिंह हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत आणि महेश मांजरेकरच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. दे धक्का या चित्रपटाचे यश पाहता, नक्कीच अभिमान वाटेल अशी गोष्ट आहे.
![]()