​ सिदधार्थ जाणार राजस्थानला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2016 17:11 IST2016-12-04T17:11:24+5:302016-12-04T17:11:24+5:30

अभिनेता सिदधार्थ चांदेकर लवकरच राजस्थानला जाणार असल्याचे कळतेय. परंतू सिदधार्थ राजस्थानला त्याच्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नाही तर मस्त ट्रीप एंजॉय ...

Siddhartha will go to Rajasthan | ​ सिदधार्थ जाणार राजस्थानला

​ सिदधार्थ जाणार राजस्थानला

िनेता सिदधार्थ चांदेकर लवकरच राजस्थानला जाणार असल्याचे कळतेय. परंतू सिदधार्थ राजस्थानला त्याच्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नाही तर मस्त ट्रीप एंजॉय करायला जाणार असल्याचे कळतेय. बरं तुम्हाला वाटेल की आता तो ट्रीपला जाणार म्हणजे नक्कीच त्याच्या फॅमिली सोबत मस्त वेळ घालवणार आणि मजा-मस्ती करणार. पण तसे बिलकुलच नाहीये. सिदधार्थ ट्रीपला जाणार आहे खरा पण स्वत:च्या फॅमिली सोबत नाही तर दुसºयांच्या फॅमिली सोबत हा पठ्ठ्या ट्रीपला जातोय असे कळतेय. बरं आता हे दुसते-तिसरे कोणी नसुन त्याच्या जवळचेच मित्र आहे. मित्रांच्या कुटूंबासोबत राजस्थान फिरण्याची संधी सिदधार्थने सोडलेली नाही. आणि त्याचे हे मित्र आपल्या सगळ््यांच्याच ओळखीचे आहेत. म्हणजेच ते देखील मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारच आहेत. होय, अभिनेता हेमंत ढोमे, क्षिती ढोमे, आरती वडगबळकर अशा त्याच्या काही खास दोस्तांसोबत तो राजस्थाच्या सहलीसाठी लवकरच जाणार असल्याचे समजतेय. नुकताच सिदधार्थचा वजनदार हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर यशस्वी ठरला आहे. तर सध्या तो अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणात देखील व्यस्त आहे. नुकताच तो एका मालिकेत देखील झळकला होता. आता कामाच्या एवढ्या व्यापातून स्वत:साठी थोडा वेळ काढून मस्त कुठेतरी भटकायचे आणि रिफ्रेश होऊन पुन्हा त्या लाईट, कॅमेºयाच्या झगमगाटात स्वत:ला झोकून दयायचे असेच या कलाकारांचे काम असते. म्हणूनच जर स्वत:साठी थोडा वेळ मिळाला तर कलाकार लगेचच बॅग भरून हॉलिडेज एंजॉय करायला निघतात. आता सिदधार्थ देखील राजस्थानची ही सफर नक्कीच अविस्मरणीय करणार एवढे मात्र खरे.

Web Title: Siddhartha will go to Rajasthan