सिद्धार्थ जाधवच्या पत्नीनं सुरू केला स्वतःचा नवा बिझनेस, कलाकारांनी दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 07:00 IST2022-08-27T07:00:00+5:302022-08-27T07:00:00+5:30

अभिनेता ​​ सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav)ने मराठी सिनेइंडस्ट्रीसोबत हिंदी सिनेइंडस्ट्रीतदेखील स्वतःची ओळख बनवली आहे. नुकताच त्याचा दे धक्का २ ...

Siddharth Jadhav's wife started her own new business, actors wished her well | सिद्धार्थ जाधवच्या पत्नीनं सुरू केला स्वतःचा नवा बिझनेस, कलाकारांनी दिल्या शुभेच्छा

सिद्धार्थ जाधवच्या पत्नीनं सुरू केला स्वतःचा नवा बिझनेस, कलाकारांनी दिल्या शुभेच्छा

अभिनेता ​​सिद्धार्थ जाधव(Siddharth Jadhav)ने मराठी सिनेइंडस्ट्रीसोबत हिंदी सिनेइंडस्ट्रीतदेखील स्वतःची ओळख बनवली आहे. नुकताच त्याचा दे धक्का २ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. लवकरच तो आता एका नव्या शोचे सूत्रसंचालन करणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सिद्धार्थचे त्याची पत्नी तृप्ती अक्कलवारसोबत काहीतरी बिनसले असल्याची चर्चा होता. दरम्यान परदेशात ट्रिप एन्जॉय करताना या दोघांनी आपल्या लेकींसोबत ​​एकत्र वेळ घालवला होता. ही चर्चा समोर येत असतानाच तृ​​प्तीने तिच्या इंस्टाग्रामवरून सिद्धार्थचे नाव हटवून तृप्ती अक्कलवार केले होते. त्यामुळे या चर्चेला आणखी उधाण आले होते. मात्र अखेर त्यांच्यात सर्व काही ठीक असल्याचे सांगत अभिनेत्याने या चर्चांना पूर्णविराम लावला होता. 

सिद्धार्थ जाधवची पत्नी ​तृप्ती घरसंसार सांभाळण्यासोबतच बिजनेस वुमन देखील आहे, हे बहुतेकांना माहीत नसेल. दोन वर्षांपूर्वी तृप्तीने दादर येथे स्वतःचे सलून उभारले होते. दादर येथील रानडे रोडवरील तिचे लॅकमे सलून देखील आहे. या सलूनच्या उद्घाटनाला अंकुश चौधरी आणि मेधा मांजरेकर यांनी हजेरी लावली होती. हा व्यवसाय सुरू असतानाच तृप्तीने आणखी एक कपड्यांचा ब्रँड बाजारात आणला आहे.

स्वरा आणि इरा या दोन लेकीच्या नावाचे आद्याक्षर घेऊन ‘स्वइरा’ या नावाने तिने हा व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायाची कल्पना तृप्तीची खास मैत्रीण श्वेता शिंदे हिला सुचली होती. त्यामुळे एकमेकांना साथ देत त्यांनी आपला नवा ब्रँड बाजारात आणण्याचे धाडस केले आहे. 


दोन दिवसांपूर्वी ठाण्यात या ब्रॅंडचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यावेळी तेथे तृप्ती आवर्जून हजर राहिली होती. आपलं स्वप्न पूर्ण झालं, असे म्हणत तृप्तीने या व्यवसाय संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. तिच्या या नवीन व्यवसायानिमित्त मराठी सेलिब्रिटींनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Siddharth Jadhav's wife started her own new business, actors wished her well