​सिद्धार्थ जाधवच्या गेला उडत या नाटकाचे झाले 150 प्रयोग पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2017 16:54 IST2017-05-08T11:24:01+5:302017-05-08T16:54:01+5:30

सिद्धार्थ जाधवची मुख्य भूमिका असलेले गेला उडत हे नाटक प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाला प्रेक्षकांची ...

Siddharth Jadhav went to Udal from the play and completed 150 experiments | ​सिद्धार्थ जाधवच्या गेला उडत या नाटकाचे झाले 150 प्रयोग पूर्ण

​सिद्धार्थ जाधवच्या गेला उडत या नाटकाचे झाले 150 प्रयोग पूर्ण

द्धार्थ जाधवची मुख्य भूमिका असलेले गेला उडत हे नाटक प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाला प्रेक्षकांची तुडुंब गर्दी असते. या नाटकाचे दिग्दर्शन केदार शिंदेचे असून या नाटकाची पहिल्या दिवसापासूनच प्रचंड चर्चा आहे. या नाटकाचा टीझर देखील काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या टिझरला सोशल मीडियावर प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. 
बेला शिंदे यांच्या थर्डबेल प्रॉडक्शन्स आणि प्रसाद कांबळी यांच्या भद्रकाली प्रॉडक्शन्स यांच्या संयुक्त विद्यमानाने या नाटकाची निर्मिती केली आहे. या नाटकाच्या माध्यमातून अभिनेता सिद्धार्थ जाधव हा बऱ्याच काळाने रंगभूमीवर परतला आहे. त्याच्या नेहमीच्या शैलीतला निखळ विनोद आणि धमाल कथानक हे 'गेला उडत'चे वैशिष्ट्य आहे. पहिल्या प्रयोगापासूनच प्रेक्षकांनी या नाटकाला भरभरून दाद दिली आहे. या नाटकाचे नुकतेच 150 भाग पूर्ण झाले. त्या निमित्ताने या नाटकाच्या टीमने केक कापून आनंद व्यक्त केला. यावेळी या नाटकाच्या संपूर्ण टीमसोबत या नाटकाचे निर्माते प्रसाद कांबळी देखील उपस्थित होते. सिद्धार्थने या नाटकात मारुती ही व्यक्तिरेखा साकारली आहे. या नाटकात त्याच्यासोबतच अर्चना निपाणकर, सुरभी फडणीस, घनश्याम घोरपडे, गणेश जाधव, अमीर तडवळकर, किरण नेवाळकर, गौरव मोरे, सचिन गावडे, सुमीत सावंत आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. या नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे असून शितल तळपदे यांनी या नाटकाची प्रकाशयोजना केली आहे. ओंकार मंगेश दत्त यांनी या नाटकासाठी गीतलेखन केले असून साई-पियुष यांनी या नाटकाला संगीत दिले आहे तर सोनिया परचुरे आणि सॅड्रिक डिसूझा यांनी नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.

Web Title: Siddharth Jadhav went to Udal from the play and completed 150 experiments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.