गेल्या आठवड्याभरापासून सिद्धार्थ जाधव होता रुग्णालयात, खुद्द अभिनेत्यानेच दिली ही माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 19:51 IST2022-08-15T19:51:02+5:302022-08-15T19:51:31+5:30
Siddharth Jadhav: सिद्धार्थ जाधवची इंस्टाग्रामवरील पोस्ट चर्चेत आली आहे. ही पोस्ट पाहून चाहते चिंता व्यक्त करत आहेत.

गेल्या आठवड्याभरापासून सिद्धार्थ जाधव होता रुग्णालयात, खुद्द अभिनेत्यानेच दिली ही माहिती
मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav)ने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर फक्त मराठीतच नाही तर बॉलिवूडमध्येही एन्ट्री केली आहे. सिद्धार्थ सोशल मीडियावर सक्रीय असून तो या माध्यमातून आपल्या चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान आता त्याची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. त्याला कारणही तसेच आहे. सिद्धार्थ गेल्या आठवड्याभरापासून रुग्णालयात दाखल होता आणि आता त्याला डिस्चार्ज मिळाला असून याबाबतची माहिती त्याने सोशल मीडियावर दिली आहे.
सिद्धार्थ जाधवने इंस्टाग्रामवर हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत लिहिले की, नमस्कार....गेला आठवडाभर मी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल होतो..आज घरी आलो... मनापासून आभार हिंदुजा हॉस्पिटलच्या स्टाफचं..खूप मनापासुन काळजी घेतली माझी... अभिनव महाडीक दादा आणि त्यांची संपूर्ण टिम... एका फोनवर नेहमीच धावून येणारे अमेय खोपकर दादा ....शशांक नागवेकर दादा लव्ह यू अलवेज.
त्याने पुढे म्हटले की, सतीश राजवाडे दादा आणि स्टार प्रवाह परिवार तुमचा पाठिंबा खूप महत्त्वाचा होता..... आणि माझा मोठा भाऊ डॉ. लवेश जाधव जो रात्रभर जागून माझी काळजी घेत होता.. मी बरा व्हा व्हा म्हणून ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं.. त्यांना मनापासून धन्यवाद... आता हळूहळू बरा होतोय... खूप धावपळ असते आपली... पण त्यातही स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होणार नाही याची कृपया काळजी घ्या...लव्ह यू ऑल..#आपलासिध्दू.
सिद्धार्थ जाधव रुग्णालयात का दाखल होता, यामागचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र त्याच्या पोस्टवर सेलिब्रेटींसह चाहते काळजी व्यक्त करत आहेत. नुकताच सिद्धार्थचा दे धक्का २ चित्रपट रिलीज झाला.