VIDEO : ‘दे धक्का 2’ हाऊसफुल्ल, सिद्धार्थ जाधवने प्रेक्षकांना दिलं अनोखं सरप्राईज!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 13:34 IST2022-08-09T13:34:15+5:302022-08-09T13:34:49+5:30
De Dhakka 2 : ‘दे धक्का 2’ हा चित्रपट 5 ऑगस्टला प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचीच एक झलक अभिनेता सिद्धार्थ जाधवने व्हिडीओत दाखवली आहे.

VIDEO : ‘दे धक्का 2’ हाऊसफुल्ल, सिद्धार्थ जाधवने प्रेक्षकांना दिलं अनोखं सरप्राईज!!
‘दे धक्का’ या चित्रपटाची सीक्वल ‘दे धक्का 2’ ( De Dhakka 2) नुकताच रिलीज झाला. पहिल्या भागाइतकाच दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. अनेक ठिकाणी ‘दे धक्का 2’चे शो हाऊसफुल्ल आहेत. आता प्रेक्षकांचा या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर त्यांना रिटर्न गिफ्ट तर मिळायलाच हवं... सिद्धार्थ जाधवने (Siddharth Jadhav ) प्रेक्षकांना अनोखं गिफ्ट दिलं. होय, सिद्धार्थनं थिएटरमध्ये जाऊन प्रेक्षकांना मस्तपैकी सरप्राइज दिलं. याचा व्हिडीओ त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
‘दे धक्का 2’ हा चित्रपट 5 ऑगस्टला प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचीच एक झलक अभिनेता सिद्धार्थ जाधवने व्हिडीओत दाखवली आहे.
सिद्धार्थ जाधव थिएटरमध्ये एन्ट्री घेतो आणि सगळेच जण त्याला बघताच एकच गलका करतात. संपूर्ण महाराष्ट्रभर ‘दे धक्का 2’ प्रदर्शित झाला आहे. चित्रपट हाऊसफुल झाला असून धिंगाना प्रतिसाद पहायला मिळतोय. धिंगाना ऑडियन्स आहे, धिंगाना पब्लिक आहे, धिंगाना रिसपॉन्स आहे, असं सिद्धार्थ व्हिडीओत म्हणतो.
‘दे धक्का 2’ मध्ये सिद्धार्थने धनाजीची भूमिका साकारली आहे. ‘दे धक्का’ हा चित्रपट 2008 साली चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग रिलीज झाला आहे. ‘दे धक्का 2’मध्ये शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, मेधा मांजरेकर या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.