...आणि सिद्धार्थ जाधव मुख्यमंत्री शिंदेंच्या पाया पडला, पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 11:34 IST2024-02-23T11:32:39+5:302024-02-23T11:34:20+5:30

सिद्धार्थ जाधवचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल झालाय. सिद्धार्थ मुख्यमंत्री शिंदेंच्या पाया पडला आहे.

Siddharth Jadhav take blessing from cm eknath shinde and dcm devendra fadnavis | ...आणि सिद्धार्थ जाधव मुख्यमंत्री शिंदेंच्या पाया पडला, पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल

...आणि सिद्धार्थ जाधव मुख्यमंत्री शिंदेंच्या पाया पडला, पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल

काल ५७ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेते उपस्थित होते. पुरस्कारांचं वितरण करायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीही खास उपस्थिती होती. या सोहळ्यातील एक व्हिडीओ व्हायरल झालाय. अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना दिसला.

 महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती होती. त्यावेळी सिद्धार्थ जाधव मुख्यमंत्र्यांना भेटायला आला. सिद्धार्थने मुख्यमंत्र्यांच्या पायाला स्पर्श करुन त्यांना नमस्कार केला. पुढे मुख्यमंत्र्यांनी सिद्धार्थला टाळी दिली. सिद्धार्थने मुख्यमंत्र्यांचा हात हातात घेऊन त्यांच्याशी काही वेळ गप्पा मारुन त्यांचा निरोप घेतला. 

काल मुंबईत ५७ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यासाठी लोकप्रिय कलाकारांची उपस्थिती होती. शानदार नृत्याविष्कार, धम्माल कॉमेडी स्किट्स अन् गाजलेल्या कलाकृतींचा गौरव असं या पुरस्कार सोहळ्याचं स्वरुप होतं. 

 

Web Title: Siddharth Jadhav take blessing from cm eknath shinde and dcm devendra fadnavis