​सिद्धार्थ चांदेकरचे फेसबुक पेज आणि इन्स्टाग्राम अकाऊंट झाले व्हेरिफाइड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2017 15:44 IST2017-03-02T10:14:27+5:302017-03-02T15:44:27+5:30

सिद्धार्थ चांदेकरने अग्निहोत्र या मालिकेपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने त्याच्या केवळ सात-आठ वर्षांच्या कारकिर्दीत मराठी इंडस्ट्रीत स्वतःचे नाव ...

Siddharth Chandekar's Facebook page and installagram account was verified | ​सिद्धार्थ चांदेकरचे फेसबुक पेज आणि इन्स्टाग्राम अकाऊंट झाले व्हेरिफाइड

​सिद्धार्थ चांदेकरचे फेसबुक पेज आणि इन्स्टाग्राम अकाऊंट झाले व्हेरिफाइड

द्धार्थ चांदेकरने अग्निहोत्र या मालिकेपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने त्याच्या केवळ सात-आठ वर्षांच्या कारकिर्दीत मराठी इंडस्ट्रीत स्वतःचे नाव निर्माण केले आहे. मराठी चित्रपटातील त्याच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. मराठीसोबतच त्याने काही हिंदी मालिकांमध्येदेखील काम केले आहे. 
सिद्धार्थचे फेसबुकला कित्येक वर्षांपासून अकाऊंट आहे आणि तो त्याच्या अकाऊंटवर चांगलाच अॅक्टिव्ह असतो. याचसोबत त्याने काही वर्षांपूर्वी फेसबुकवर सिद्धार्थ सीमा चांदेकर या नावाने त्याचे पेज तयार केले होते. या पेजवर तो त्याचे फोटो, व्हिडिओ अपलोड करत असतो. तसेच त्याच्या आगामी प्रोजेक्टविषयी त्याच्या फॅन्सना सांगत असतो. फेसबुक अकाऊंट इतकाच सिद्धार्थ त्याच्या फेसबुक पेजलादेखील अॅक्टिव्ह असतो. काही वेळा कामात व्यग्र असल्यास त्याची टीम फेसबुक पेजवर अपडेट करत असते. त्याचे हे फेसबुक पेज नुकतेच फेसबुककडून व्हेरिफाइड करण्यात आलेले आहे आणि त्याबाबत तो प्रचंड खूश आहे. आतापर्यंत त्याच्या फेसबुक पेजला वीस हजाराहून जास्त लाइक्स मिळाल्या आहेत. केवळ फेसबुकच पेजच नव्हे तर त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंटदेखील व्हेरिफाइड करण्यात आले आहे. त्याने आतापर्यंत या अकाऊंटवर 569 पोस्ट केल्या असून त्याच्या अकाऊंटला 1 लाख 25 हजाराहून अधिक फोलोव्हर्स आहेत. 
सिद्धार्थचे फेसबुक पेज आणि इन्स्टाग्राम अकाऊंट व्हेरिफाय झाल्यानंतर त्याने लगेचच त्याच्या फॉलोव्हर्सचे आभार मानले. तसेच त्याच्या सोशल नेटवर्किंग सांभाळणाऱ्या टीमचेदेखील त्याने आभार मानले आहेत. माझ्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या आणि माझे पोस्ट आवडीने वाचणाऱ्या फॅन्सचे आभार असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे. एकाचवेळी फेसबुक पेज आणि  इन्स्टाग्राम अकाऊंट व्हेरिफाइड झाल्याने सध्या तो खूपच खूश आहे. 




Web Title: Siddharth Chandekar's Facebook page and installagram account was verified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.