बायकोच्या 'या' कृतीमुळे सिद्धार्थवर आली चक्क ताक विकण्याची वेळ, म्हणाला, 'योग्य दरात...'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 02:18 PM2023-04-18T14:18:05+5:302023-04-18T14:21:09+5:30

सिद्धार्थवर चक्क ताक विकायची वेळ आली आहे. असं का घडलं तुम्हीच बघा.

siddharth chandekar video viral his wife mitali mayekar ordered 8 litres of buttermilk | बायकोच्या 'या' कृतीमुळे सिद्धार्थवर आली चक्क ताक विकण्याची वेळ, म्हणाला, 'योग्य दरात...'

बायकोच्या 'या' कृतीमुळे सिद्धार्थवर आली चक्क ताक विकण्याची वेळ, म्हणाला, 'योग्य दरात...'

googlenewsNext

मराठी सिनेसृष्टीतील क्युट कपल सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि मिताली मयेकर(Mitali Mayekar) सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. लग्नानंतर दैनंदिन जीवनात घडणाऱ्या विनोदी प्रसंगांचे व्हिडिओ ते आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत असतात. यामुळे चाहत्यांचंही मनोरंजन होत असतं. तर इतर सेलिब्रिटीही त्यांची मजा घेत असतात. मात्र आता सिद्धार्थवर चक्क ताक विकायची वेळ आली आहे. असं का घडलं तुम्हीच बघा.

सिद्धार्थने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तो म्हणतो, मी बायकोला उन्हाळा आहे म्हणून ताकाचे ७- ८ टेट्रापॅक ऑर्डर करायला सांगितले. पण बायकोने काय ऑर्डर केले बघा. थेट ८ लीटर ताक मितालीने ऑर्डर केलं आहे. तो विचारतो तुला नक्की किती ताक ऑर्डर करायचं होतं?' यावर मिताली हसत हसतच म्हणते, '८ लीटर. आपण आता हायड्रेटेड राहुया आणि हे सगळं ताक संपवूया.' हे पाहून सिद्धार्थलाही घाम फुटतो. तो म्हणतो, 'सांगा कोणाला ताक हवं असेल तर आमच्याकडे आहे.'

दोघांचा हा कॉमेडी व्हि़डिओ पाहून इतर कलाकारांनीही कमेंट्स केल्या आहेत. क्षिती जोग म्हणाली, 'होतं रे असं कधीकधी', तर चाहत्यांनीही दोघांची मजा केली आहे. 'म्हणूनच मुलींना डोकं नसतं असं मुलं म्हणतात' अशी कमेंट एकाने केली आहे. याआधीही सिद्धार्थ आणि मितालीने अनेक असे छोटे छोटे कॉमेडी व्हिडिओ पोस्ट केले आहेत. 

Web Title: siddharth chandekar video viral his wife mitali mayekar ordered 8 litres of buttermilk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.