"लोन, डाऊनपेमेंट, खर्च म्हणत उडी मारलीच", सिद्धार्थ चांदेकरची 'ती' पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 17:03 IST2023-03-23T17:01:36+5:302023-03-23T17:03:22+5:30

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची खास पोस्ट

siddharth chandekar marathi actor post on one year for registering mumbai house | "लोन, डाऊनपेमेंट, खर्च म्हणत उडी मारलीच", सिद्धार्थ चांदेकरची 'ती' पोस्ट व्हायरल

"लोन, डाऊनपेमेंट, खर्च म्हणत उडी मारलीच", सिद्धार्थ चांदेकरची 'ती' पोस्ट व्हायरल

मुंबईत स्वत:चं घर घेणं हे आजवर अनेकांचं स्वप्न राहिलं असेल. सामान्यांसाठी तर ही फार मोठी उडी असते. आपल्याला वाटतं सेलिब्रिटी मोठमोठ्या घरात राहतात त्यांची घर घेण्याची तेवढी ऐपत असते पण त्यांच्यासाठी सुद्धा ही सोपी गोष्ट नाही हे अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या (Siddharth Chandekar) पोस्टमधून लक्षात येईल.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने पत्नी मिताली मयेकरसह (Mitali Mayekar) गेल्यावर्षीच मुंबईत हक्काचं घर घेतलं. रितसर डाऊनपेमेंट करत त्यांना घराचं स्वप्न पूर्ण केलं. मुंबईत पहिलं घर रजिस्टर करुन आज एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्याने खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने मितालीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे जो गेल्यावर्षीचा घर रजिस्टर करतानाचा फोटो आहे. दोघांच्या बोटांना शाई लागलेली आहे. या फोटोवर सिद्धार्थने लिहिले, 'वर्षभरापूर्वी मी मुंबईतलं माझं पहिलं घर रजिस्टर केलं. लोन, डाऊनपेमेंट, खर्च ह्याची भीती वाटायची, नंतर जाणवलं भीती उडी मारायची होती. ती मारल्यावर आपोआप पोहता येतं.'

सिद्धार्थच्या या पोस्टवरुन लक्षात येतं की उडी मारणं किती गरजेचं आहे. नंतर आपोआप पोहता येणारच आहे. सिद्धार्थ आणि मितालीचं गोरेगाव येथे छानसं घर आहे. दोघेही सध्या त्यांच्या प्रोजेक्ट्स मध्ये व्यस्त आहेत. सिद्धार्थ लवकरच 'झिम्मा २ ' मध्ये दिसणार आहे.

Web Title: siddharth chandekar marathi actor post on one year for registering mumbai house