'श्रीदेवी प्रसन्न' सिनेमाचा टीझर आऊट! 'या' दिवशी प्रदर्शित होणार सई-सिद्धार्थची अरेंजवाली लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 12:44 PM2024-01-03T12:44:44+5:302024-01-03T12:46:41+5:30

या सिनेमात लग्नासाठी योग्य जोडीदाराच्या शोधात असलेल्या श्रीदेवी-प्रसन्न या दोघांची गोष्ट प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. 

siddharth chandekar and sai tamhankar sridevi prasanna movie teaser out | 'श्रीदेवी प्रसन्न' सिनेमाचा टीझर आऊट! 'या' दिवशी प्रदर्शित होणार सई-सिद्धार्थची अरेंजवाली लव्हस्टोरी

'श्रीदेवी प्रसन्न' सिनेमाचा टीझर आऊट! 'या' दिवशी प्रदर्शित होणार सई-सिद्धार्थची अरेंजवाली लव्हस्टोरी

मराठी मनोरंजन विश्वासह बॉलिवूडलाही भुरळ घालणारी मोस्ट ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर या दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. सई आणि सिद्धार्थच्या 'श्रीदेवी प्रसन्न' सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. या सिनेमातून एक आगळीवेगळी लव्ह स्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

 सई ताम्हणकरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत टीझर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या पोस्टला कॅप्शन देत सईने लिहीलं आहे की, 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, जगाचं भले ही सेम असेल, पण 'श्रीदेवी प्रसन्न'चं नसतं. #SrideviPrasanna - २ फेब्रुवारी पासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!'. या सिनेमात लग्नासाठी योग्य जोडीदाराच्या शोधात असलेल्या श्रीदेवी-प्रसन्न या दोघांची गोष्ट प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. 

'श्रीदेवी प्रसन्न' चित्रपटाचे लेखन अदिती मोघे यांनी केले आहे. तर विशाल विमल मोढवे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर अमित राज यांनी संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.  श्रीदेवी प्रसन्न' हा सिनेमा 2 फेब्रुवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या लाडक्या जोडीसह हा चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकता.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर,  सिद्धार्थ चांदेकरचा झिम्मा-2 हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. तर सई देखील विविध चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. काही दिवसांपूर्वी तिचा मिमी हा चित्रपट रिलीज झाला होता. आता "श्रीदेवी प्रसन्न"  या चित्रपटात सिद्धार्थ आणि सई यांची जोडी पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

Web Title: siddharth chandekar and sai tamhankar sridevi prasanna movie teaser out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.