सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरसाठी चक्क गोरेगावमध्ये अवतरले साउथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 16:22 IST2021-01-09T16:22:03+5:302021-01-09T16:22:33+5:30
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरसाठी चक्क गोरेगावमध्ये अवतरले साउथ
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. नुकतीच मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे तिचा बॉयफ्रेंड मेहुल पैसोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. त्यानंतर आता लवकरच मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. सध्या त्या दोघांचे केळवण जोरात असून त्यांचे फोटो सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत. आता तर त्या दोघांसाठी गोरेगावमध्ये दक्षिण भारत अवतरले होते. हे खुद्द सिद्धार्थ चांदेकरने सोशल मीडियावर सांगितले आहे.
सिद्धार्थ चांदेकरने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर करत लिहिले की, काल पहिल्यांदा गोरेगाव ईस्टमध्ये साउथ बघायला मिळाले. धन्यवाद आरती वडगबाळकर आणि आशुतोष परांडकर. आपल्यासाठी आपल्या मित्रांनी केलेल्या गोष्टी किती सुंदर असतात याची जाणीव झाली. बिनाशर्त. हेच आम्हाला कदाचित हवे होते.
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरचे हे केळवण जरा हटके होते. कारण त्या दोघांनी साउथ इंडियन पेहराव केला होता. इतकेच नाही तर त्यांना केळीच्या पानात जेवण वाढले होते.
या दोघांचं लग्न पुण्यापासून एका तासाच्या अंतरावर असलेल्या एका जुन्या वाड्यामध्ये होणार आहे. या दोघांच्या लग्नाची तारीख अजून तरी गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. मात्र त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत.