समुद्र किनारी रोमाँस करताना दिसले सिद्धार्थ चांदेकर - मिताली मयेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 12:04 IST2020-02-17T11:59:31+5:302020-02-17T12:04:06+5:30

मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकरच्या या फोटोवर फॅन्सकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  

Siddharth chandekar and mitali mayekar enjoying in australia | समुद्र किनारी रोमाँस करताना दिसले सिद्धार्थ चांदेकर - मिताली मयेकर

समुद्र किनारी रोमाँस करताना दिसले सिद्धार्थ चांदेकर - मिताली मयेकर

मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची होणारी भावी पत्नी म्हणजेच अभिनेत्री मिताली मयेकर हे दोघं सातत्याने सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत असतात. गेल्या यावर्षी या दोघांचा साखरपुडा झाला आहे. 


मितालीने सिद्धार्थसोबतचा ऑस्ट्रेलियामधला फोटो शेअर केला आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर उभं राहून  हा फोटो काढला आहे. मिताली आणि सिद्धार्थच्या या फोटोवर फॅन्सकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  


सिद्धार्थ आणि मिताली लवकरच एका ऑस्ट्रेलियन चित्रपटात झळकणार आहेत. हे दोघंही चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी कदाचित ऑस्ट्रेलियात असतील.सिद्धार्थने याबाबत सांगितलं, की ‘हा चित्रपट म्हणजे एक कौटुंबिक ड्रामा आहे. एक रोड ट्रीप हा विषय यात हाताळला गेला आहे. आलोक राव हा चित्रपट दिग्दर्शित करतोय.


‘उर्फी’ चित्रपटातून मितालीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं त्यानंतर झी युवावरच्या ‘फ्रेशर्स’ मालिकेतही मितालीनं काम केलं. तर ‘गुलाबजाम’, ‘क्लासमेट’ यांसारखे अनेक चित्रपट ‘अग्निहोत्र’, ‘प्रेम हे’ यांसारख्या मालिकेतून सिद्धार्थने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

Web Title: Siddharth chandekar and mitali mayekar enjoying in australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.