लग्नाआधी एकमेकांसोबत असे एन्जॉय करतंय हे कपल, काही महिन्यांपूर्वीच झाला साखरपुडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 07:15 IST2019-10-01T07:15:00+5:302019-10-01T07:15:00+5:30
युनिव्हर्सल स्टुडीओ, सेंटोसा आयलँड अशा वेगवेगळ्या स्थळांना भेट देत एन्जॉय करताना पाहायला मिळतायेत.

लग्नाआधी एकमेकांसोबत असे एन्जॉय करतंय हे कपल, काही महिन्यांपूर्वीच झाला साखरपुडा
मराठी इंडस्ट्रीतील हॉट कपल सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. दोघे नेहमी त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या दोघांच काय सुरु आहे असा प्रश्न यांच्या फॅन्सना पडणं साहजिकच आहे. मात्र तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिताली आणि सिद्धार्थच्या सोशल मीडिया अकाउंटवर मिळतील. कारण मिताली आणि सिद्धार्थ सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. दोघेही सोशल मीडियावर प्रत्येक अपडेट शेअर करत असतात. त्यामुळे हे कपल सध्या काय करते आणि कुठे आहे याची उत्तरं इथेच मिळतील.
बिझी शेड्युअलमधून वेळ काढत सिद्धार्थ आणि मिताली दोघंही सिंगापुरमध्ये एकत्र वेळ घालवत असून सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. याच स्पेशल क्षणांचे फोटो दोघांनीही आपल्या सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केले आहेत. युनिव्हर्सल स्टुडीओ, सेंटोसा आयलँड अशा वेगवेगळ्या स्थळांना भेट देत एन्जॉय करताना पाहायला मिळतायेत. वेगवेगळ्या पोज देत मिताली फोटोसेशन करते तर कधी प्रवासाचा आनंद लुटताना ती दिसते.
सिंगापुरमधील प्रत्येक क्षण सिद्धार्थ आणि मिताली कॅमेऱ्यात कैद करत आहे. नेहमीप्रमाणे दोघांची केमिस्ट्री खूप छान वाटते आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगत होत्या. मात्र दोघांनी याविषयी मौनच बाळगले होते. अखेर साखरपुडा होण्याआधीच सिद्धार्थ आणि मिताली हे रिलेशनशिपमध्ये असल्याचे जगजाहीर झाले.
त्याआधी त्यांचे एकत्र वेळ घालवतानाचे अनेक खास फोटो मिताली सोशल मीडियावर शेअर करायची. साखरपुडा आधी हे कपल गोव्यात एकत्र एन्जॉय करताना दिसले होते. त्यानंतर व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी एकमेकांसह फोटो शेअर करुन त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. आता हे दोघे लग्नाच्याबेडीत कधी अडकणार याकडेच सा-यांचे लक्ष लागले आहे.