सिया करणार सिंपल भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 15:24 IST2016-08-31T09:54:14+5:302016-08-31T15:24:14+5:30
बॉलिवूड चित्रपट आणि मालिकांमधून आपल्याला नेहमीच हॉट अंदाजात पाहायला मिळालेली अभिनेत्री सिया पाटील ...

सिया करणार सिंपल भूमिका
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">
बॉलिवूड चित्रपट आणि मालिकांमधून आपल्याला नेहमीच हॉट अंदाजात पाहायला मिळालेली अभिनेत्री सिया पाटील आता प्रेक्षकांसमोर एकदम सिंपल भूमिकेत येणार आहे. सियाने आत्तापर्यंत बोल्ड भूमिकेतून प्रेक्षकांना दर्शन दिले होते. परंतू आता तिच्या आगामी फक्त तुझ्याचसाठी या मराठी चित्रपटात ती एकदमच सालस रूपात दिसणार आहे. फक्त तुझ्याचसाठी हा चित्रपट सियाच्या करिअरसाठी महत्वपूर्ण असणार आहे. प्रथमच सिंपल भूमिका साकारलेली सिया या चित्रपटात काय कमाल करणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. हा चित्रपट लव ट्रँगल असल्याने यामध्ये आपल्याला यश कपूर आणि लीना बोकेफोडे हे कलाकार देखील दिसणार आहेत. सियाने यामध्ये एका सोज्वळ पत्नीची भूमिका साकारली आहे. यश कपूरने यामध्ये सियाच्या पतीची भूमिका साकारली आहे. जबरदस्त अॅक्शन आणि रोमान्स आपल्याला फक्त तुझ्याचसाठी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अंकिता तारे,नफे खान,विलास उजवणे,अंजली उजवणे,हेतल राठोड,देवदास डोंगरे,भावना करीके,अंजु धर आदी कलाकार चित्रपटात पहायला मिळणार आहेत. पार्श्व मोशन पिच्चर निर्मित आणि यश फिल्म्स व्हीझन प्रस्तुत करीत असून या चित्रपटाचे दिग्दर्शन एस. प्यारेलाल आणि जगन्नाथ रंगधोल यांनी केली आहे. चित्रपटाचे निर्माते कनक पटेल,राजेंद्र रावत,मिलिंद पांडे,ओमप्रकाश सिंग,जयेश दंड हे आहेत तसेच सहनिमार्ते अनुभव एस. विनोद आहेत. सहाय्यक निर्माते संदेश कोळी,शशीकांत मिश्रा,विशाल चौधरी आणि संगीता पटेल हे आहेत. हा लव ट्रँगल नक्की कसा निर्माण होतो आणि यातून आपले नाते सिया कशाप्रकारे टिकवते हे आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल.