"हेमंत ढोमेच्या सिनेमात तेच तेच लोक असतात...", मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिजमबद्दल स्पष्टच बोलली श्वेता शिंदे
By कोमल खांबे | Updated: April 3, 2026 13:43 IST2026-04-03T13:41:10+5:302026-04-03T13:43:03+5:30
गेली कित्येक वर्ष इंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या श्वेताने काही मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्वेताने इंडस्ट्रीतील सतत बोलल्या जाणाऱ्या ग्रुपिजम आणि नेपोटिझमबद्दल भाष्य केलं.

"हेमंत ढोमेच्या सिनेमात तेच तेच लोक असतात...", मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिजमबद्दल स्पष्टच बोलली श्वेता शिंदे
मराठी कलाविश्वात काही मोजक्याच अभिनेत्री आहेत ज्या अभिनयासोबत निर्मितीदेखील करतात. श्वेता शिंदे ही अशाच अभिनेत्रींपैकी एक. लागिर झालं जी, देवमाणूस, मिसेस मुख्यमंत्री, लाखात एक आमचा दादा अशा गाजलेल्या मालिकांची निर्मिती तिने केली आहे. गेली कित्येक वर्ष इंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या श्वेताने काही मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्वेताने इंडस्ट्रीतील सतत बोलल्या जाणाऱ्या ग्रुपिजम आणि नेपोटिझमबद्दल भाष्य केलं.
श्वेताने भार्गवी चिरमुलेच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये तिला इंडस्ट्रीतील ग्रुपिजम आणि नेपोटिझमबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा श्वेताने अगदी स्पष्ट शब्दांत तिचं उत्तर मांडलं. ती म्हणाली, "कम्फर्ट झोन असतो म्हणून ग्रुपिजम होत असेल. उदाहरणच द्यायचं झालं तर हेमंत ढोमेच्या सिनेमात आपल्याला सेमच स्टारकास्ट दिसते. एका पॉइंटनंतर त्याचा तो कम्फर्ट झोन होत असावा. कारण, त्या व्यक्तीला तो ओळखायला लागतो. त्या व्यक्तीसाठी मग त्या भूमिका लिहिल्या जातात. आणि म्हणून ग्रुपिजम होतं असं मला वाटतं. आता माझ्याकडेही असे काही कलाकार आहेत जे प्रोजेक्टमध्ये पुन्हा पुन्हा दिसतात. तो एक कम्फर्ट झोन निर्माण झालाय. पण ग्रुपिजम आणि नेपोटिझम असं काहीच नसतं".
आलिया भटचं उदाहरण देत श्वेता म्हणाली, "नेपोटिझममध्ये तुम्हाला एखादी संधी मिळू शकते असं मी म्हणेन. माझ्या मुलीला जर करिअर करायचं झालं तर तिला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ती संधी नक्कीच लवकर मिळेल. पण, तिच्याकडे ती एकच संधी असेल...तिथे जर ती फेल गेली तर मग ती फेलच आहे. त्या एका संधीतच तिला चमकायचं आहे. मग तेव्हा हार्डवर्क, टॅलेंट या गोष्टींना पर्याय नाही. आलिया भट ही महेश भटची मुलगी म्हणून यशस्वी झालेली नाही. तिने स्वत:ला सिद्ध केलं".