‘कागर’ नंतर शुभंकर तावडे दिसणार ‘दिल दोस्ती दुनियादारी’सिनेमात, दिसणार 'या' भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 19:47 IST2020-10-02T19:45:00+5:302020-10-02T19:47:44+5:30

शुभंकरने गेल्यावर्षी कागर चित्रपटातून रुपेरी पडद्यावर एन्ट्री केली होती.

Shubhankar tawde to appear in 'dil dosti duniyadari movie after kagar | ‘कागर’ नंतर शुभंकर तावडे दिसणार ‘दिल दोस्ती दुनियादारी’सिनेमात, दिसणार 'या' भूमिकेत

‘कागर’ नंतर शुभंकर तावडे दिसणार ‘दिल दोस्ती दुनियादारी’सिनेमात, दिसणार 'या' भूमिकेत

कागर’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत डेब्यू केल्यावर आता अभिनेता शुभंकर तावडे पहिल्यांदाच रॉम-कॉम सिनेमात दिसणार आहे. शुभंकरच्या आगामी 'दिल दोस्ती दुनियादारी' ह्या सिनेमाचे चित्रीकरण लवकरच पुण्यात सुरू होतंय.  

'काळे धंदे' ह्या वेबसीरिजमूळे तरूणाईत चांगलाच प्रसिध्द असलेल्या शुभंकरने 'कागर' सिनेमा केल्यानंतर तर त्याचे अनेक चाहते त्याने एक रोमँटिक सिनेमा करावा अशी मागणी करत होते. आता ह्या नव्या सिनेमामूळे त्याच्या चाहत्यांची ही इच्छा नक्कीच पूर्ण होईल.

लॉकडाऊननंतर सेटवर परतायला उत्साहित असलेला शुभंकर म्हणतो,”लॉकडाऊननंतर सेटवर पोहोचण्यासाठी मी खूपच एक्सायटेड आहे. शुटिंग  करतेवेळी आम्ही निश्चितच सगळ्या खबरदा-या घेणार आहोत. ‘न्यू नॉर्मल’साठी आता आम्ही मानसिकरित्या सज्ज झालो आहोत. सेटवर अगदी नेमकेच तंत्रज्ञ आणि कलाकार असतील. मात्र ह्याचा परिणाम चित्रीकरणाच्या गुणवत्तेवर होणार नाही.”

भूमिकेविषयी विचारल्यावर शुभंकर म्हणतो,  “मी ह्या सिनेमात तरूण नावाच्या कवी, गायक आणि गिटारिस्ट मुलाच्या भूमिकेत तुम्हांला दिसेन. आपण रॉकस्टार बनावं असं तरूणचे स्वप्न असतं. आपले ही मोठमोठे स्टेज शो व्हावेत अशी त्याची इच्छा असते.”

शुभंकरने गेल्यावर्षी कागर चित्रपटातून रुपेरी पडद्यावर एन्ट्री केली होती. त्याबद्दल त्याने सांगितलं होतं की, माझा कागर हा पहिलाच चित्रपट. मोठे बॅनर, स्टारकास्ट, तसेच स्क्रिप्ट नवी असल्याने मला माझी भूमिका आव्हानात्मक वाटत होती. त्यासाठी मी काही गोष्टी नव्याने शिकायचे ठरवले. गावांत जाऊन काही लोकांसोबत चर्चा केली.
 

Web Title: Shubhankar tawde to appear in 'dil dosti duniyadari movie after kagar

टॅग्स :Kagar Movieकागर