शुभांगी लाटकर करतात अभिनयासोबत समाजसेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2017 17:11 IST2017-03-11T11:41:48+5:302017-03-11T17:11:48+5:30
शुभांगी लाटकरने बंध अनुबंध, गंगा की धीज, रक्तसंबंध, तू भेटशी नव्याने, लेक लाडकी या घरची, पिंजरा यासारख्या अनेक वेगळ्या ...
शुभांगी लाटकर करतात अभिनयासोबत समाजसेवा
श भांगी लाटकरने बंध अनुबंध, गंगा की धीज, रक्तसंबंध, तू भेटशी नव्याने, लेक लाडकी या घरची, पिंजरा यासारख्या अनेक वेगळ्या धाटणीच्या मालिकांमध्ये काम केले आहे. पिंजरा या मालिकेत त्यांनी साकारलेली भूमिका तर प्रेक्षकांना खूप आवडली होती. तसेच त्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये झळकल्या आहेत. मराठीसोबत हिंदी चित्रपटांमध्येदेखील त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. फोर्स 2, आशिकी 2, जॉली एल एल बी यांसारख्या चित्रपटामध्ये त्यांनी काम केले होते. हिंदीतील अनेक चित्रपटात त्या आईच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत असून या भूमिकांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे.
शुभांगी लाटकर यांनी अभिनय क्षेत्रात येण्याआधी मानसशास्त्र या विषयात पदवी मिळवली होती. तसेच केंद्र सरकारच्या पर्यटन विभागात त्यांनी 18 वर्षं नोकरी केली होती. या दरम्यान त्यांनी आपल्या नोकरीसोबतच आपले छंददेखील जोपासले. त्यांनी अभिनयक्षेत्रात करियर करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि संपूर्ण वेळ अभिनयाला वाहून दिला. आज त्यांनी आपल्या अभिनयातून स्वतःला सिद्ध केले आहे. त्या एक अभिनेत्री असण्यासोबतच त्यांना सामाजिक भानदेखील आहे. महिला सक्षमीकरणावर त्यांची मते खूप स्पष्ट आहेत. महिला ही सशक्त असून ती कुठेच कमी नाही असे त्यांचे स्पष्ट मत आहे. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर महिला काहीही करू शकते असे त्यांचे म्हणणे आहे. आजवर एक स्त्री, आई, बहीण, बायको अशा वेगवेगळ्या नात्यात तिने स्वतःला सिद्ध केल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी खास महिलांसाठी एक संस्थादेखील स्थापन केली आहे. या संस्थेमार्फत त्या स्त्रियांना आपल्या अस्तित्वासाठी तुम्ही पुढे यायला पाहिजे असा संदेश नेहमीच देत असतात.