फोटोत दिसणारी ही मुलगी आहे मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध चेहरा, साऊथमध्येही आहे तिचा दबदबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 08:00 IST2021-12-12T08:00:00+5:302021-12-12T08:00:02+5:30
श्रृतीने (shruti marathe) तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

फोटोत दिसणारी ही मुलगी आहे मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध चेहरा, साऊथमध्येही आहे तिचा दबदबा
श्रुती मराठेने (shruti marathe) तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती 'श्रुती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या अंदाजातील श्रुतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंतीची पावती दिली आहे. तिने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने मधून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.
आलीकडेच श्रुतीने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर तिचे एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात श्रृतीचे लहानपणीचा आणि आताचे फोटो दिसतायेत. ट्रेंडस असा हॅशटॅग श्रुतीने या व्हिडीओसोबत दिला आहे.श्रुतीच्या अभिनया इतकीच तिच्या सौंंदर्याची चर्चा असते. श्रुती इन्स्टाग्रामवर आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.
श्रुतीने अभिनेता गौरव घाटणेकरसोबत लग्न केले आहे. तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. गौरव घाटणेकर मराठी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील एक नावाजलेले नाव आहे.