Super Cute: या अभिनेत्याचा मुलीसह फोटो पाहून तुम्ही बॉलिवूडच्या स्टारकिडसना विसराल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 16:04 IST2020-04-08T16:03:40+5:302020-04-08T16:04:25+5:30
श्रेयसनं नुकतंच सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Super Cute: या अभिनेत्याचा मुलीसह फोटो पाहून तुम्ही बॉलिवूडच्या स्टारकिडसना विसराल
सेलिब्रिटी मंडळी कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससह संवाद साधतात. सोशल मीडियावर आपल्या सिनेमांच्या प्रमोशनपासून ते स्वतःच्या जीवनातील गोष्टींची माहिती सेलिब्रिटी सोशल मीडियावर शेअर करत असतात.
सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार मंडळी आपल्या जीवनातील काही सुखद आणि खास क्षणसुद्धा रसिकांसह शेअर करतात.
मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेसुद्धा सोशल मीडियावर बराच अॅक्टिव्ह असतो. श्रेयसनं नुकतंच सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचा हा फोटो रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोत बाप-लेकीचं प्रेमळ नातं पाहायला मिळत आहे. फोटोत बाहुबलीची पोज देत श्रेयसने आपल्या लाडक्या मुलीसह हा फोटो क्लिक केला आहे. मुलीसह खेळत निवांत आणि सुखी क्षणांचा आनंद घेत असल्याचं यांत दिसत आहे. या फोटोला त्याने समर्पक असे कॅप्शनही दिले आहे.
श्रेयसचे आपल्या लेकीवर असलेले जीवापाड प्रेम पाहायला मिळत आहे. लेकीसोबतच्या प्रत्येक फोटोमध्ये श्रेयसमध्ये दडलेला हळवा अन् तितकाच भावनिक बाबा पाहायला मिळत आहे.बापाचे लेकीवरील हे प्रेम पाहून फॅन्सही भारावले असून त्यांच्याकडून या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.
श्रेयस आणि दीप्ती यांच्या आयुष्यात सरोगसीच्या माध्यमातून मुलीचे आगमन झालं. श्रेयस आणि दीप्ती हे १३ वर्षांपूर्वी विवाह बंधनात अडकले होते. दीप्ती आणि श्रेयसप्रमाणेच बॉलिवूडमध्ये सनी लिऑन, तुषार कपूर, करण जोहर, आमिर खान, शाहरूख खान या सेलिब्रिटींच्या आयुष्यातही सरोगसीच्या माध्यमातून बाळाचे आगमन झाले आहे.