"मी इथे राज्य करायला आलोय, कोणाच्या फाटक्यात...", श्रेयस तळपदेची 'ती' पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 11:48 IST2025-08-04T11:47:11+5:302025-08-04T11:48:27+5:30
श्रेयस तळपदेच्या एका पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या या पोस्टची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

"मी इथे राज्य करायला आलोय, कोणाच्या फाटक्यात...", श्रेयस तळपदेची 'ती' पोस्ट चर्चेत
केवळ अभिनयानेच नाही तर आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. मराठीसोबतच श्रेयसने हिंदी सिनेसृष्टीही गाजवली. एवढंच नव्हे तर पुष्पाचा आवाज बनून श्रेयस आजही प्रेश्रकांच्या मनावर राज्य करतो आहे. श्रेयस तळपदे हा अतिशय गुणी अभिनेता. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून त्याने अभिनयाची छाप पाडली. त्याचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे.
श्रेयस सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. नवीन प्रोजेक्टचे अपडेट्स तो चाहत्यांना देत असतो. त्यासोबतच श्रेयस त्याच्या चाहत्यांना वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही देतो. सध्या चर्चा रंगलीये ती श्रेयसच्या एका पोस्टची. श्रेयसने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याचा रुबाबदार अवतार पाहायला मिळत आहे. काळ्या रंगाची पँट, टीशर्ट आणि जॅकेट असा लूक श्रेयसने केला आहे. या फोटोंमध्ये त्याचा बॉसी अवतार पाहायला मिळत आहे. या फोटोला श्रेयसने हटके कॅप्शन दिलं आहे. "मी इथे कोणाच्याही फाटक्यात पाय घालायला आलेलो नाही...मी इथे राज्य करण्यासाठी आलोय", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याच्या या पोस्टची प्रचंड चर्चा रंगली असून चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
श्रेयसने 'अपना सपना मनी मनी', 'गोलमाल', 'हाऊसफुल', 'पोश्टर बॉईज', 'वेलकम टू सज्जनपूर', 'ग्रेट ग्रँड मस्ती' अशा सुपरहिट हिंदी सिनेमांमध्ये काम केलंय. 'पछाडलेला', 'सावरखेड एक गाव', 'ही अनोखी गाठ' हे त्याचे गाजलेले मराठी सिनेमे. 'माझी तुझी रेशीमगाठ' ही श्रेयसची मालिकाही लोकांना आवडली. अलिकडेच त्याचा 'हाऊसफूल ५' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. तर 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.