"श्रेयस लवकर बरा हो", अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर मंगेश देसाईने व्यक्त केली काळजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 14:06 IST2023-12-16T14:05:09+5:302023-12-16T14:06:03+5:30
श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक मंगेश देसाईंनी त्याच्यासाठी पोस्ट शेअर केली आहे.

"श्रेयस लवकर बरा हो", अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर मंगेश देसाईने व्यक्त केली काळजी
मराठी अभिनेताश्रेयस तळपदेला दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने सगळ्यांनाच त्याच्या प्रकृतीबद्दल चिंता वाटू लागली होती. त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचीही माहिती होती. त्यानंतर आता श्रेयसची प्रकृती स्थिर आहे. श्रेयसच्या प्रकृतीबाबत त्याचे चाहते आणि कलाकारही चिंतेत होते.
श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक मंगेश देसाईंनी त्याच्यासाठी पोस्ट शेअर केली आहे. मंगेश देसाईंनी इन्स्टाग्रामवरुन श्रेयस तळपदेबरोबरचा फोटो शेअर केला आहे. श्रेयसच्या प्रकृतीसाठी मंगेश देसाईंनी पोस्टमधून प्रार्थना केली आहे. "श्रेयस देसाई कुटुंब आणि संपूर्ण मराठी नाट्य आणि चित्र सृष्टी च्या शुभेछया तुझ्या पाठीशी आहेत .लवकर बरा हो .उत्तम सिनेमे करून प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं आहे तुला," असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या पोस्टवर श्रेयसच्या चाहत्यांनीही कमेंट करत त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे.
दरम्यान, श्रेयस तळपदेला 'वेलमक टू जंगल' सिनेमाचं शूटिंग पूर्ण करून घरी आल्यानंतर अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्याने गुरुवारी सिनेमातील काही अॅक्शन सीक्वेन्स शूट केले होते. दिवसभर तो शूटिंग करत होता आणि त्याची प्रकृती उत्तम होती. पण घरी आल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याच्या पत्नीने लगेचच त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं.