श्रेया पिळगावकर, सिद्धार्थ जाधव प्रिया बापट, सई ताम्हणकर, पूजा सावंत,​ या कलाकारांनी दिली सैनिकांना मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2017 14:21 IST2017-01-22T08:34:24+5:302017-01-22T14:21:18+5:30

आपल्या देशाच्या रिअल हिरोंना म्हणजेच सैनिकांना मराठी चित्रपटसृष्टीतील रिल लाईफमधील हिरोंनी एका वेगळ््याच प्रकारे मानवंदना दिली आहे. होय, मराठी ...

Shreya Pilgaonkar, Siddharth Jadhav Priya Bapat, Sai Tamhankar, Puja Sawant, these artists honored soldiers | श्रेया पिळगावकर, सिद्धार्थ जाधव प्रिया बापट, सई ताम्हणकर, पूजा सावंत,​ या कलाकारांनी दिली सैनिकांना मानवंदना

श्रेया पिळगावकर, सिद्धार्थ जाधव प्रिया बापट, सई ताम्हणकर, पूजा सावंत,​ या कलाकारांनी दिली सैनिकांना मानवंदना

ल्या देशाच्या रिअल हिरोंना म्हणजेच सैनिकांना मराठी चित्रपटसृष्टीतील रिल लाईफमधील हिरोंनी एका वेगळ््याच प्रकारे मानवंदना दिली आहे. होय, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिदध फोटोग्राफर तेजस नेरुरकरने नुकतेच त्याच्या खास कॅलेंडरचे अनावरण केले आहे. या कॅलेंडरची थीम होती सीमेवर लढणाºया सैनिकांना सलामी देण्याची. मग काय, सर्वच कलाकारांनी एकत्र येऊन अंगावर वर्दी चढवून झक्कास फोटोशूट केले आहे. केवळ अभिनेतेच नाही तर अभिनेत्री देखील या फोटोशूटमध्ये तडफदार लुकमध्ये दिसत आहेत.  वैभव तत्त्ववादी, सुबोध भावे, नेहा पेंडसे, श्रेया पिळगावकर, सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी ,उमेश कामत, प्रिया बापट, आदिनाथ कोठारे, उर्मिला कोठारे, सई ताम्हणकर, पूजा सावंत, हे कलाकार आपल्याला या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहेत. याविषयी तेजस सांगतोय, मी आपल्या सर्व सैनिकांना मानवंदना म्हणून हे कॅलेंडर केले आहे. आपल्याला सर्वांनाच सैनिकांबद्दल खूप आदर आहे आणि तो व्यक्त करण्यासाठीचा माझा हा एक छोटासा प्रयत्नं मी केला आहे. आपल्यासाठी २४ तास सीमेवर रक्षण करणाºया, युद्धाच्या वेळी अंगावर गोळ्या झेलणा-या आपल्या रक्षणकर्त्या सैनिकांसाठी मी हे कँलेडर केले असल्याचे तेजसने एका मुलाखतीत सांगितले आहे.  

Web Title: Shreya Pilgaonkar, Siddharth Jadhav Priya Bapat, Sai Tamhankar, Puja Sawant, these artists honored soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.