जितेंद्र जोशीसोबत मराठी सेलिब्रेटी करणार पाणी फाऊंडेशनसाठी श्रमदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2017 18:17 IST2017-04-21T12:47:41+5:302017-04-21T18:17:41+5:30
महाराष्ट्रातील दुष्काळविरोधात महाराष्ट्रदिनी तुफान येणार आहे. सेलिब्रेटी महाश्रमदान करण्याबरोबरच लोकांना सहभागी करून घेणार आहेत. यासाठी अभिनेते जितेंद्र जोशीने पुढाकार ...

जितेंद्र जोशीसोबत मराठी सेलिब्रेटी करणार पाणी फाऊंडेशनसाठी श्रमदान
म ाराष्ट्रातील दुष्काळविरोधात महाराष्ट्रदिनी तुफान येणार आहे. सेलिब्रेटी महाश्रमदान करण्याबरोबरच लोकांना सहभागी करून घेणार आहेत. यासाठी अभिनेते जितेंद्र जोशीने पुढाकार घेतला आहे. आमिर खानच्या पुढाकारातून पाणी फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे आणि त्याच्या मार्फत जलसंधारणाच्या कामातून दुष्काळविरोधात लढा देणाऱ्या गावांसाठी वॉटर कप स्पर्धा घेण्यात येत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार या चळवळीत सहभागी झाले असून गावकऱ्यांना प्रोत्साहन देण्याबरोबरच स्वतःही श्रमदान करत आहेत. यंदाच्या वॉटरकप स्पर्धेनिमित जितेंद्र जोशीने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा खास व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे आणि 1 मे रोजी महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून संपूर्ण राज्यभर महाश्रमदान केले जाणार आहे. प्रत्येकाने आपल्या जवळच्या गावात जाऊन सकाळी सहा ते नऊ श्रमदान करावे असे आवाहन करण्यात येत आहे. सेलिब्रेटींनी आपल्या सोशल मीडिया ग्रुपवरून जितेंद्र जोशीने आवाहन केले आहे. नो गुड मॉर्निंग, गुड नाइट मेसेजेस, फक्त आणि फक्त पाणी असे या ग्रुपचे वैशिष्ट्य राहणार आहे.