आशयसंपन्न चित्रपटांना आधार द्यायलाच हवा-

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2017 18:14 IST2017-04-14T12:44:55+5:302017-04-14T18:14:55+5:30

'अस्तु' या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटानंतर गौरिका फिल्म्सच्या शीला राव ६ गुण या हा चित्रपट प्रस्तुत करत आहेत. 'आशयसंपन्न चित्रपटांना ...

Should not support selfie films | आशयसंपन्न चित्रपटांना आधार द्यायलाच हवा-

आशयसंपन्न चित्रपटांना आधार द्यायलाच हवा-

'
;अस्तु' या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटानंतर गौरिका फिल्म्सच्या शीला राव ६ गुण या हा चित्रपट प्रस्तुत करत आहेत. 'आशयसंपन्न चित्रपटांना आधार द्यायलाच हवा,' असं शीला राव यांना वाटतं.मुलावरील अभ्यासाच्या दडपणाचा विशय मांडत मुलांचं भावविश्व टिपणारा ६ गुण हा चित्रपट १४ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाद्वारे किरण गावडे यांनी त्यांची  दिग्दर्शकीय वाटचाल सुरू केली आहे. उज्ज्वला गावडे यांनी निर्मिती केली असून, अशोक कोटियन आहेत. आणि शीला राव यांनी चित्रपट प्रस्तुत केला आहे.  बऱ्याच महोत्सवांमध्ये या चित्रपटाचा गौरव झाला आहे. या चित्रपटात आर्चित देवधर, अमृता सुभाष, सुनील बर्वे, अतुल तोडणकर, आरती सोळंकी, प्रणय रावराणे  अशी उत्तम स्टारकास्ट आहेत. '६ गुण या चित्रपटाचा विषय वेगळा आणि महत्त्वाचा आहे. आताच्या स्पर्धेच्या काळात मुलांना मोकळीक राहिलेली नाही. अभ्यासाचं दडपण, स्पर्धा या सगळ्यात त्यांचं बालपण हरवून जातं. हा चित्रपट पालकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यासाठीच हा चित्रपट प्रस्तुत करायचं ठरवलं,' असं राव यांनी सांगितलं.'अस्तु हा चित्रपट आशयसंपन्न होता. ६ गुण हा चित्रपटाचा विषयही महत्त्वाचा आहे. आशयसंपन्न चित्रपटाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आधार देण्याची गरज आहे. हा चित्रपट प्रेक्षकांनी, विशेषत: पालकांनी आवर्जून पहायला हवा,' असंही त्या म्हणाल्या.'६ गुण' या चित्रपटात एकूण चार गाणी असून यातील एक गाणे सुरेश वाडकर यांनी गायले आहे.अमृता सुभाष आणि आर्चित देवधर किल्ला या चित्रपटात एकत्र झळकले होते. त्या दोघांनी या चित्रपटात आई-मुलाची भूमिका साकारली होती. अमृता आणि आर्चितची जोडी आता किल्लानंतर प्रेक्षकांना पुन्हा एकदा एका चित्रपटात पाहायला मिळत आहे. आणि विशेष म्हणजे या चित्रपटातही ते दोघे आई-मुलाच्या भूमिकेमध्येच झळकत आहेत.  

Web Title: Should not support selfie films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.