सूरसपाटा या चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2016 11:27 IST2016-05-08T05:57:27+5:302016-05-08T11:27:27+5:30
महाराष्ट्राच्या मातीत खेळणारा रांगडा असा कबड्डी हा खेळ नेहमीचा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आता, याच खेळावर आधारित असणाºया आगामी ...

सूरसपाटा या चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात
महाराष्ट्राच्या मातीत खेळणारा रांगडा असा कबड्डी हा खेळ नेहमीचा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आता, याच खेळावर आधारित असणाºया आगामी सुरसपाटा या चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात झाली आहे. संपूर्ण टीमने गणपती बाप्पा मोरया म्हणत दमदार सुरूवात केली आहे. चित्रपटाचे कथानक कबड्डी खेळावर अपार प्रेम असलेल्या लहान मुलांवर आधारित आहे. मंगेश कंठाळे दिग्दर्शित या चित्रपटातून महत्त्वकांक्षी मुले तसेच ज्येष्ठ कलाकार मोठ्या पडद्यावर पाहायला मिळतील. जयंत लाडे प्रस्तुत सुर सपाटा हा कबड्डी खेळावर लक्ष केन्द्रीत करणारा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांची उत्सुकता वाढविणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात राष्ट्रीय स्तरावर पोहोचणाºया काही खेळाडू देखील या चित्रपटात झळकणार आहे. त्यामुळे साहिजकच या खेळाडूंची कबड्डी नक्कीच या चित्रपटाला चार चाँद लावतील.