प्राजक्ता माळीच्या 'लकडाउन'चे शूटिंग झाले पूर्ण, दिसणार अंकुश चौधरीसोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 17:55 IST2020-12-23T17:54:39+5:302020-12-23T17:55:31+5:30

प्राजक्ता माळीने नुकतेच 'लकडाउन' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे आणि ही माहिती तिने इंस्टाग्रामवर दिली आहे.

Shooting of Prajakta Mali's 'Lockdown' is over, will be seen with Ankush Chaudhary | प्राजक्ता माळीच्या 'लकडाउन'चे शूटिंग झाले पूर्ण, दिसणार अंकुश चौधरीसोबत

प्राजक्ता माळीच्या 'लकडाउन'चे शूटिंग झाले पूर्ण, दिसणार अंकुश चौधरीसोबत

प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. प्राजक्ता माळीने नुकतेच लकडाउन चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे आणि ही माहिती तिने इंस्टाग्रामवर दिली आहे.

प्राजक्ता माळीने फोटो शेअर करत लकडाउन चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याचे सांगितले आणि तिने या चित्रपटातील सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच तिने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत असल्याचेही सांगितले. 


लकडाउन या चित्रपटात प्राजक्ता माळीसोबत अभिनेता अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग जुन्नर येथे पार पडले आहे. संतोष रामदास मांजरेकर हे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.


सध्या प्राजक्ता छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'चे सूत्रसंचालन करताना दिसते आहे. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत.

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत.

मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्राजक्ताने विविध भूमिका साकारल्या आहेत. प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ताला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे.

Web Title: Shooting of Prajakta Mali's 'Lockdown' is over, will be seen with Ankush Chaudhary