​प्रिया बापट करतेय भोपाळमध्ये चित्रीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2017 12:19 IST2017-04-08T06:49:06+5:302017-04-08T12:19:06+5:30

प्रिया बापट सध्या तिच्या एका आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण ती भोपाळ येथे करत असून या ...

Shooting in Bhopal by Priya Bapat | ​प्रिया बापट करतेय भोपाळमध्ये चित्रीकरण

​प्रिया बापट करतेय भोपाळमध्ये चित्रीकरण

रिया बापट सध्या तिच्या एका आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण ती भोपाळ येथे करत असून या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो तिने फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर नुकतेच पोस्ट केले आहेत. या फोटोत ती आपल्याला एका सुंदर पंजाबी ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच या फोटोतील तिचा लूक हा खूपच ट्रॅडिशनल आहे. या लूकच्या ती प्रेमात पडली आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण तिने या लूकसाठी डिझायनरचे आभारदेखील मानले आहेत. हा साधा पण मनात लगेचच भरणारा लूक खूपच छान असल्याचे तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच मी सध्या खूप व्यग्र असून हे सगळे खूप एन्जॉय करत असल्याचेदेखील तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. प्रियाने हा फोटो पोस्ट केल्यापासून या फोटोला अनेक लाइक्स मिळाल्या असून अनेकांनी या फोटोवर कमेंट्सदेखील दिल्या आहेत. प्रिया या फोटोत अतिशय मोठ्या माळरानावर दिसत आहे. तर तिच्या बाजूला एक बाइक आहे तर समोर नदी आहे. या चित्रपटाचे लोकेशन फोटोत खूपच छान दिसत आहे. 
प्रिया बापटने गेल्या वर्षी वजनदार या चित्रपटात काम केले होते. तिच्या या चित्रपटातील भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटासाठी तिने अनेक किलो वजन वाढवले होते आणि त्यानंतर तितकेच किलो वजन कमीदेखील केले होते. या चित्रपटात एक वेगळी प्रिया प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. वजनदारनंतर आता प्रिया कोणत्या चित्रपटात झळकणार याची तिच्या फॅन्सना उत्सुकता लागलेली आहे. 


Web Title: Shooting in Bhopal by Priya Bapat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.