शिवानी रांगोळे का नाकारते चित्रपट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2016 11:47 IST2016-11-21T11:47:53+5:302016-11-21T11:47:53+5:30

प्रत्येक कलाकारासाठी मोठा पडदा हा सर्वात महत्वाचा असतो. कारण मोठया पडदयावर झळकण्यासाठी प्रत्येक कलाकार हा उत्सुक असतो. त्यासाठी ते ...

Shivni Rangole denies movie? | शिवानी रांगोळे का नाकारते चित्रपट?

शिवानी रांगोळे का नाकारते चित्रपट?

रत्येक कलाकारासाठी मोठा पडदा हा सर्वात महत्वाचा असतो. कारण मोठया पडदयावर झळकण्यासाठी प्रत्येक कलाकार हा उत्सुक असतो. त्यासाठी ते मोठया प्रमाणावर प्रचंड मेहनत घेतानादेखील पाहायला मिळतात. मात्र अभिनेत्री शिवानी रांगोळे ही मोठया पडदयावर झळकण्यासाठी का नकार देते याचा शोध लोकमत सीएनएक्सने घेतला आहे. कारण सध्या शिवानी ही बन मस्का या मालिकेमधून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. यातील तिची भूमिका फार कमी वेळात प्रेक्षकांना भावली आहे. या मालिकेत तिच्यासोबत शिवराज वैचाळ दिसत आहे. सध्या त्यांची ही मालिका तरूणांच्या मनावर राज्य करत आहे. अशा या मालिकेच्या बिझी शेडयुल्डमुळे शिवानीला इतर चित्रपटांच्या तारखा जुळून घेता येत नसल्यामुळे ती चित्रपट नाकारत असल्याचे समजत आहे. तसेच कलाकारांचे आयुष्य हे कॅमेरा,अ‍ॅक्शन, कट, रिटेक या सभोवताली फिरणारे आहे. सततच्या तारखा त्यामुळे निर्माण होणारे बिझी शेडयुल्ड यामुळे त्यांना स्वत:साठीदेखील वेळ नसतो. तर चित्रपटांना कधी वेळ देणार असा ही प्रश्न तिच्यासमोर उपस्थित झाला असणार हे मात्र नक्की. परंतु मालिका संपल्यानंतर ती नक्कीच पुन्हा प्रेक्षकांना चित्रपटात दिसणार आहे. यापूर्वी शिवानी फुंतरू, अ‍ॅण्ड जरा हटके या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. त्याचप्रमाणे मालिका आणि नाटकांमधूनदेखील तिने आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना दाखविली आहे. तिची शेजारी शेजारी पक्के शेजारी ही मालिकादेखील प्रेक्षकांना खूप भावली होती. त्याचप्रमाणे सध्या ती लेखिकादेखील बनली आहे. नुकताच तिचा एक लघुपट लिहून पूर्ण झाला आहे. त्यामुळे अभिनेत्रीबरोबर ती आता लेखिका म्हणूनदेखील प्रेक्षकांन समोर येणार आहे. 


Web Title: Shivni Rangole denies movie?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.