शिवानी रांगोळे झळकणार रंगभूमीवर ही अफवा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 17:14 IST2017-02-10T11:44:46+5:302017-02-10T17:14:46+5:30

 कलाकारांच्या बाबतीत अफवा हा काय प्रकार नवीन नाही. नेहमीच अफवाच्याबाबतीत कलाकारांना बळीचा बकरा बनविले जात असल्याचे नेहमीच पाहायला मिळाले. ...

Shivani rangouake rumawake rumors on the stage? | शिवानी रांगोळे झळकणार रंगभूमीवर ही अफवा?

शिवानी रांगोळे झळकणार रंगभूमीवर ही अफवा?

 
लाकारांच्या बाबतीत अफवा हा काय प्रकार नवीन नाही. नेहमीच अफवाच्याबाबतीत कलाकारांना बळीचा बकरा बनविले जात असल्याचे नेहमीच पाहायला मिळाले. या सर्व गोष्टींचा कलाकारांना फार त्रास देखील होत असतो. अशाच एका अफवाला शिवानी रांगोळेला सामोरे जावे लागत आहे. प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री रंगभूमीवर नाटक करण्यास सज्ज झाली आहे. अशा बातम्या कित्येक दिवसांपासून पसरत आहेत. मात्र ही केवळ अफवा असल्याचे समोर आले आहे. तिला नाटक आणि चित्रपटाच्या माध्यमातून बºयाच आॅफर येत आहेत. पण शिवानी ही सध्या बनमस्का या मालिकेच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र आहे. त्यामुळे तिला इतर गोष्टींसाठी वेळ नसल्याचे समजत आहे. या अभिनेत्रीने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तिने अ‍ॅण्ड जरा हटके, फुंतरू असे अनेक चित्रपट दिले आहेत. अ‍ॅण्ड जरा हटके हा तिचा चित्रपट प्रकाश कुंटे यांनी दिग्दर्शित केला होता. तिच्यासोबत या चित्रपटात अभिनेता सिध्दार्थ मेनन झळकला होता. या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. तसेच तिची  शेजारी शेजारी पक्के शेजारी ही मालिकादेखील प्रेक्षकांना खूप भावली होती. अशाप्रकारे ती चित्रपट आणि छोटया पडदयाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत असते. आता यासर्व गोष्टींच्या पलीकडे जाऊन  सध्या ती लेखिकादेखील बनली आहे. नुकताच तिचा एक लघुपट लिहून पूर्ण झाला आहे. त्यामुळे अभिनेत्रीबरोबर ती आता लेखिका म्हणूनदेखील प्रेक्षकांन समोर येणार आहे. त्यामुळे आता शिवानी विविधांगी भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

Web Title: Shivani rangouake rumawake rumors on the stage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.