“शिवराय प्रेमींसाठी आऊसाहेब असणारी व्यक्ती माझ्यासाठी...”, लाडक्या सासूबाईंसाठी शिवानी रांगोळेची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 11:48 IST2023-08-23T11:47:39+5:302023-08-23T11:48:10+5:30

मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे ही सासूसूनेची जोडी सुभेदार चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

shivani rangole shared special post for mother in law mrinal kulkarni for subhedar movie | “शिवराय प्रेमींसाठी आऊसाहेब असणारी व्यक्ती माझ्यासाठी...”, लाडक्या सासूबाईंसाठी शिवानी रांगोळेची पोस्ट

“शिवराय प्रेमींसाठी आऊसाहेब असणारी व्यक्ती माझ्यासाठी...”, लाडक्या सासूबाईंसाठी शिवानी रांगोळेची पोस्ट

छोट्या पडद्यावर सोनपरीची भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेल्या दिग्गज अभिनेत्री मृणाल कुलकर्णी त्यांच्या विविधांगी भूमिकांसाठी ओळखल्या जातात. सोनपरीप्रमाणेच प्रेक्षकांनी त्यांना राजमाता जिजाऊंच्या भूमिकेतही पसंत केलं. राजा शिवछत्रपती या मालिकेपासून ते ‘फर्जंद’, ‘पावनखिंड’ या चित्रपटांतही त्या जिजाबाईंच्या भूमिका साकारताना दिसल्या. आता दिग्पाल लांजेकरांच्या ‘सुभेदार’ चित्रपटातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटातही त्या राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत आहेत.

‘सुभेदार’ चित्रपटात अभिनेत्री शिवानी रांगोळेही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात शिवानी यशोदाबाई मालुसरे या भूमिकेत आहे. सुभेदार चित्रपटाच्या निमित्ताने मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे ही सासूसूनेची जोडी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. सुभेदार चित्रपटाच्या सेटवरील फोटो शेअर करत शिवानीने सासूबाईंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. “समस्त शिवराय प्रेमींसाठी आऊसाहेब असणारी व्यक्ती माझ्यासाठी ताई आहे ह्याचा अभिमान आणि आनंद, सुभेदार चित्रपटात एकत्र काम करून द्विगुणित झाला! दिग्पाल लांजेकर ह्या क्षणाबद्दल खूप खूप धन्यवाद!!!” असं शिवानीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“माझ्या सासूचं लग्न”, सिद्धार्थच्या आईसाठी मितालीची खास पोस्ट, म्हणाली, “मला अभिमान वाटतो...”

शिवानीच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी सुभेदारसाठी मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे या सासू-सूनांना शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात विराजस कुलकर्णीही दिसणार आहे. विराजस सुभेदारमध्ये जीवा हे पात्र साकारणार आहे. २५ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नरवीर तान्हाजी मालुसरेंच्या शौर्याची असीम गाथा आणि सिंहगडाच्या लढाईचा थरार यातून पडद्यावर दाखविण्यात येणार आहे.

शिवानी आणि मृणाल कुलकर्णी या सासूसूनांचं नातंही खास आहे. चित्रपटात शिवानीबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर करत त्यांनी सूनबाईला कौतुकाची थाप दिली होती. दरम्यान, शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी यांनी ३ मे २०२२ रोजी लग्नाच्या बेडीत अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Web Title: shivani rangole shared special post for mother in law mrinal kulkarni for subhedar movie