"बाईपण भारी देवाचा ट्रेलर पाहिल्यानंतर...", शिल्पा शेट्टीने केलं केदार शिंदेंचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 15:22 IST2024-01-30T15:22:08+5:302024-01-30T15:22:33+5:30

'बाईपण भारी देवा'चा ट्रेलर पाहून भारावून गेलेली शिल्पा शेट्टी, म्हणाली...

shilpa shetty praises marathi director kedar shinde for baipan bhari deva movie | "बाईपण भारी देवाचा ट्रेलर पाहिल्यानंतर...", शिल्पा शेट्टीने केलं केदार शिंदेंचं कौतुक

"बाईपण भारी देवाचा ट्रेलर पाहिल्यानंतर...", शिल्पा शेट्टीने केलं केदार शिंदेंचं कौतुक

२०२३ या वर्षातील सर्वाधिक गाजलेला मराठी सिनेमा म्हणजे 'बाईपण भारी देवा'. केदार शिंदेंच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत बिग बजेट हिंदी चित्रपटांनाही तगडी टक्कर दिली होती. सहा बहिणींची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. रोहिणी हट्टांगडी, सुचित्रा बांदेकर, दीपा चौधरी, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने, वंदना गुप्ते अशी या सिनेमाची स्टारकास्ट होती. अनेक सेलिब्रिटींनीही या सिनेमासाठी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. आता बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने 'बाईपण भारी देवा'चं कौतुक केलं आहे. 

शिल्पा शेट्टीने नुकतीच 'लोकमत फिल्मी'च्या 'पंचायत'मध्ये हजेरी लावली होती. 'इंडियन पोलीस फोर्स' या रोहित शेट्टीच्या वेब सीरिजमधून शिल्पा शेट्टीने ओटीटीवर पदार्पण केलं आहे. या वेब सीरिजच्या निमित्ताने रोहित शेट्टी, शिल्पा शेट्टी, शरद केळकर, वैद्यही परशुरामी यांनी 'लोकमत फिल्मी'ला विशेष मुलाखत दिली. यावेळी शिल्पा शेट्टीने केदार शिंदेंच्या बाईपण भारी देवा सिनेमाचं कौतुक केलं. "मी चेंबुरमध्ये राहते. मराठी लोकांमध्ये वेगळ्याच पद्धतीची एनर्जी असते. ते खूप प्रेमळ असतात. मी बाईपण भारी देवाचा ट्रेलर पाहिल्यानंतर तो सिनेमा बघण्याची खूप इच्छा होती. पण, काही कारणांमुळे मला जमलं नाही. पण, ज्या पद्धतीने त्यांनी सिनेमा बनवला आहे. ते मला आवडलं. वेड सिनेमा पण खूप छान होता," असं शिल्पा शेट्टी म्हणाली. 

दरम्यान, रोहित शेट्टीचं दिग्दर्शन असलेली 'इंडियन पोलीस फोर्स' ही वेब सीरिज १९ जानेवारीला अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाली. या सीरिजमध्ये शिल्पा शेट्टी, विवेक ओबेरॉय, सिद्धार्थ मल्होत्रा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. याबरोबरच शरद केळकर, सुचित्रा बांदेकर, वैद्यही परशुरामी, आदिश वैद्य या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

Web Title: shilpa shetty praises marathi director kedar shinde for baipan bhari deva movie