संभाजी राजांच्या भूमिकेत शशांक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 15:30 IST2016-11-04T16:15:41+5:302016-11-29T15:30:18+5:30
अभिनेता शशांक उदापूरकर लवकरच प्रेक्षकांना संभाजी राजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकताच शशांक अण्णा ...

संभाजी राजांच्या भूमिकेत शशांक
< div style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;"> अभिनेता शशांक उदापूरकर लवकरच प्रेक्षकांना संभाजी राजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकताच शशांक अण्णा हजारे यांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाला होता. आता तो संभाजी राजांची भूमिका साकारायला सज्ज झाला आहे. शशांक कोणत्या नाटकात किंवा मालिकेत नाही तर चित्रपटात संभाजी राजांची भूमिका करणार आहे. लवकरच आपल्याला संभाजी 1689हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. शिवाजी महाराजांवर अनेक मालिका आणि चित्रपट येऊन गेले आहेत. आता संभाजी महाराजांच्या शौर्य गाथेवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट काही दिवसातच प्रेक्षकांसमोर येईल. संभाजी महाराजांची भूमिका पडदयावर साकारणे ही गोष्टी सोपी नाही त्यासाठी शशांकला बरीच मेहनत घ्यावी लागली असणार. ''मी साकारत असलेली शिवाजी महाराजांचे सुपूत्र संभाजी महाराजांची भूमिका वेगळ्या प्रकारची आहे.'' अण्णांच्या भूमिकेनंतर ही भूमिका साकारणे माझ्यासाठी एक आव्हान असणार असल्याचे शशांकचे म्हणणे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश दुग्गल यांनी केले आहे. शशांक संभाजी महाराजांच्या भूमिकेला पडदयावर योग्य न्याय देणार का हे तर आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे समजतेय.