/> बॉलीवुडचा किंग खान, बादशाह अशी बिरुदे मिरविणारा अन करोडो मुलींच्या दिल कि धडकन असणारा आपला शाहरुख खान नूकताच एका मराठी शो मध्ये ठुमके लावताना दिसला. शाहरुखने मराठी चित्रपट जरी केला नसला तरी त्याच्या चाहत्यांना मात्र या शो मध्ये शाहरुखचा अंदाज पाहुन नक्कीच आनंद होईल. ब्लॅक कलरचा कुरता, पांढºया रंगाचा पटियाला अन डोक्यावर फेटा अशा अस्सल मराठमोळ््या लुकमध्ये शाहरुख या शो मध्ये आला होता. एवढेच नाही तर त्याने नववर्षाची गुढि देखील उभारली. शाहरुखच्या सगळ््यात रोमँटिक फिल्म दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे यातील सीन्स त्याच्यासमोर विनोदात्मक रितीने सादर केल्यावर शाहरुखला हसु आवरता आले नाही. त्याने या चित्रपटातील गाण्यांवर ठुमकरे देखील लावले. आता त्याच्या चाहत्यांना एवढीच प्रतिक्षा असेल कि शाहरुख मराठी चित्रपटाचा श्रीगणेशा कधी करतोय.