‘त्या’ अभिनेत्रीचे सेक्सी आणि मादक पाय कुणाच्याही मनाची ‘शिकार’ करतीय, महेश मांजरेकरांच्या आगामी सिनेमाची 'ही' आहे पोश्टर गर्ल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 15:11 IST2018-03-02T09:41:10+5:302018-03-02T15:11:10+5:30

दिग्दर्शक महेश मांजरेकर जे काही करतात त्याची कायमच चर्चा होते.त्यांचा अभिनय असो किंवा मग त्यांनी दिग्दर्शित केलेला एखादा सिनेमा. ...

'Sexy' and 'sexy' actress' act of 'hunting' curiosity, Mahesh Manjrekar's upcoming movie is' This' Poshter Girl | ‘त्या’ अभिनेत्रीचे सेक्सी आणि मादक पाय कुणाच्याही मनाची ‘शिकार’ करतीय, महेश मांजरेकरांच्या आगामी सिनेमाची 'ही' आहे पोश्टर गर्ल

‘त्या’ अभिनेत्रीचे सेक्सी आणि मादक पाय कुणाच्याही मनाची ‘शिकार’ करतीय, महेश मांजरेकरांच्या आगामी सिनेमाची 'ही' आहे पोश्टर गर्ल

ग्दर्शक महेश मांजरेकर जे काही करतात त्याची कायमच चर्चा होते.त्यांचा अभिनय असो किंवा मग त्यांनी दिग्दर्शित केलेला एखादा सिनेमा. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमांची रसिकांची नेहमीच पसंती मिळते.त्यामुळेच सध्या सगळीकडे महेश मांजरेकर यांच्या आगामी 'शिकारी' या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे.या चर्चेसाठी आणखी एक गोष्ट निमित्त ठरतेय ती म्हणजे सिनेमाचे बोल्ड आणि मादक पोस्टर.सिनेमाच्या या पोस्टरमध्ये मादक अन् तितकेच सेनश्युअस असे नायिकेचे विवस्त्र पाय दिसून येत आहेत.या पायांनी कित्येक रसिकांना बोल्ड केलंय तर अनेकांची झोप उडवलीय.हे मादक पाय कोणाचे आहेत?असा प्रश्न रसिकांना पडला होता.मात्र हे गूढ उकलले आहे. हे मादक पाय अभिनेत्री नेहा खानचे आहेत.नेहा खानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘एप्रिलमध्ये हिट वाढणार एप्रिल 20’, अशी पोस्ट शेअर केली आहे. फेसबुकवरही तिने हेच पोस्ट केले आहे.तसंच नेहाने आपल्या इंस्टाग्रामवर गेल्यावर्षी मार्चमध्ये महेश मांजरेकरांसोबतचा एक सेल्फीसुद्धा टाकला होता.यांत तिने सिनेमाचे नाव स्पष्टपणे टाकले होते.त्यामुळे महेश मांजरेकर यांच्या या 'शिकारी' या सिनेमात नेहा खानची प्रमूख भूमिका असणार हे स्पष्ट होते आहे.त्यामुळेच पोस्टरवरील ते सेक्सी पाय नेहा खानचेच आहेत यावर शिक्कामोर्तब झाले आहे.




हिंदी सिनेमाचे पोस्टर वर्षानुवर्षे अधिकाधिक बोल्ड होत चालले आहे.गेल्या काही वर्षात साध्या पोस्टरची जागा बोल्ड, सेक्सी आणि हॉट पोस्टर्सनी घेतली आहे.बॉलिवूडचा हा ट्रेंड हळूहळू मराठी सिनेमातही दिसू लागला.मराठी अभिनेत्रींनाही पोस्टरसाठी बोल्ड सीन देण्यात वावगं वाटत नसल्याचे पाहायला मिळत आहे.असंच एका बोल्ड पोस्टरची चर्चा सध्या मराठी चित्रपटसृष्टीत सुरु आहे.दिग्दर्शक विजू माने यांनी सोशल मीडियावर आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर करताच वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते.मात्र ती अभिनेत्री कोण हा गुंता सुटला असून बोल्ड पोस्टरप्रमाणेच सिनेमाही तितकाच बोल्ड असणाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तुर्तास सिनेमात संतोष जुवेकर, कुशल बद्रीके, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव हे मराठी अभिनेते झळकणार आहेत.

Web Title: 'Sexy' and 'sexy' actress' act of 'hunting' curiosity, Mahesh Manjrekar's upcoming movie is' This' Poshter Girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.