मुंबई पुणे मुंबई चित्रपटाचा सिक्वेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:44 IST2016-01-16T01:14:27+5:302016-02-06T13:44:23+5:30
मुंबई पुणे मुंबई हा चित्रपट पाच वर्षांपूर्वी पडद्यावर आला आणि त्यात भूमिका रंगवणार्या स्वप्नील जोशी व मुक्ता बर्वे या ...

मुंबई पुणे मुंबई चित्रपटाचा सिक्वेल
म ंबई पुणे मुंबई हा चित्रपट पाच वर्षांपूर्वी पडद्यावर आला आणि त्यात भूमिका रंगवणार्या स्वप्नील जोशी व मुक्ता बर्वे या जोडीवर तमाम रसिक फिदा झाले. साहजिकच या दिवाळीत या चित्रपटाचा सि.क्वेल, म्हणजे दुसरा भाग येत आहे म्हटल्यावर उत्सुकता ताणली जाणे अपेक्षितच आहे. याच पार्श्वभूमीवर, सतीश राजवाडे दिग्दर्शित मुंबई पुणे मुंबई २ हा चित्रपट प्रदर्शित होत असताना अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि या चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया यांनी लोकमत, मुंबई कार्यालयाला भेट दिली आणि चित्रपटाविषयी गप्पा रंगवल्या. लोकमत कालदर्शिका २0१६चे प्रकाशनही यावेळी या चित्रपटाच्या टीमने केले आणि दिवाळीच्या मुहूर्तावर एक आगळा योगही साधला.