ज्येष्ठ रंगकर्मी जनार्दन परब कालवश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2016 22:29 IST2016-04-03T05:29:58+5:302016-04-02T22:29:58+5:30
ज्येष्ठ रंगकर्मी जनार्दन परब यांचे २ रोजी सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दुपारी जोगेश्वरी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात ...

ज्येष्ठ रंगकर्मी जनार्दन परब कालवश
ज येष्ठ रंगकर्मी जनार्दन परब यांचे २ रोजी सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दुपारी जोगेश्वरी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. परब यांनी चार दशकाहून अधिक काळ रंगभूमी व रुपरी पडद्यावर काम केले आहे.
हिंदी-मराठी चित्रपटात जनार्दन यांनी केलेल्या लहान मोठ्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. यात ‘माझा पती करोडपती’, ‘नवरी मिळे नवºयाला’, ‘गम्मत जम्मत’ ‘कुलस्वामिनी तुळजाभवानी’ या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केलंय. तसेच नाना पाटेकर यांच्या बरोबर त्यांनी क्रांतिवीर चित्रपटात काम केले होते.
त्यांना शंकर घाणेकर पुरस्कार, २००८ चा नटवर्य केशवराव दाते पुरस्कार तसेच कॉलेज साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
हिंदीमध्ये कसम, शिकारी, ऐलान, जिद्दी, क्रांतिवीर, बाजीगर, नायक, गुलाम, उडान, चायना गेट यासारख्या चित्रपटात काम केले आहे.