बॉलीवुडमध्ये स्थिरावलेला आपला मराठमोळा हिरो रितेश देशमुखने लय भारी ...
रितेश विकणार उत्तर...
r /> बॉलीवुडमध्ये स्थिरावलेला आपला मराठमोळा हिरो रितेश देशमुखने लय भारी या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. आता रितेश पुन्हा एकदा उत्तर विकायला तयार झालाय. तुम्ही म्हणाल, रितेश कसल उत्तर विकतोय अन पहिली गोष्ट म्हणजे उत्तर विकणार म्हणजे नक्की करणार काय असे अनेक प्रश्न सर्वांच्याच मनात आले नाहीत तर नवलच. पण आपला हा हॅन्डसम हंक उत्तर विकायला तयार झालाय ते ऐका टिव्ही चॅनेलच्या कार्यक्रमासाठी. रितेश त्याचा मराठी टेलिव्हजन डेब्यु विकता का उत्तर या कार्यक्रमातून करणार आहे. माणसांमध्ये ब-याच निरनिराळ्या कला असतात. त्यातली एक हटके कला म्हणजे भाव करणं. अर्थात भाव करणं ही पण एक कलाच आहे. प्रत्येक माणसात दडलेल्या अशा भाव करणाºया या कलाकारांसाठी, स्टार प्रवाह 'विकता का उत्तर' हा एक आगळा वेगळा कथाबाह्य शो घेऊन आले आहेत. या शोचे अँकरींग रितेश कशाप्रकारे करणार आहे ते आपल्याला लवकरच समजेल. तो पर्यंत आपण फक्त उत्तर विकायची वाट पाहुयात.