सेल्फी हे मराठी नाटक आता, इंग्रजीमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 14:25 IST2016-08-02T08:52:10+5:302016-08-02T14:25:30+5:30

शिल्पा नवलकर लिखित सेल्फी या नाटकाचा विषय लोकांना एवढा आवडला की हे नाटक एप्रिलमध्ये हिंदी रंगभूमीवरही आले. आता, थेट ...

Selfie Marathi drama now, in English | सेल्फी हे मराठी नाटक आता, इंग्रजीमध्ये

सेल्फी हे मराठी नाटक आता, इंग्रजीमध्ये

ल्पा नवलकर लिखित सेल्फी या नाटकाचा विषय लोकांना एवढा आवडला की हे नाटक एप्रिलमध्ये हिंदी रंगभूमीवरही आले. आता, थेट सेल्फी हे नाटक इंग्रजीमध्येही येणार आहे. पारितोष पेन्टरने शिल्पा नवलकरकडून सेल्फीचे हिंदी आणि इंग्रजीचे अधिकार घेतले आहेत. इंग्रजी नाटकाचे दिग्दर्शन तनाझ इरानीने केले असून, नाटकाची निर्मिती पारितोष पेन्टर यांनी केले आहे. यात तनाझ इरानी, डिंपल शहा, श्वेता गुलाटी, प्रिया मलिक आणि किश्वर मर्चंड या पाच जणी काम करणार आहेत. तिन्ही भाषांचा प्रेक्षक जरी वेगळा असला तरी मूळ विषय दमदार असल्यामुळे कोणत्याही भाषेमधल्या प्रेक्षकांना सेल्फी आवडेलच. इंग्रजी नाटकासाठी जॉय सिंग गुप्ता यांनी भाषांतर केले आहे. इंग्रजी भाषेतही हे नाटक येतंय याचा मला आनंदच होत आहे. प्रत्येक व्यक्तीने बघावं असं हे नाटक आहे. मराठीमध्येही या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

Web Title: Selfie Marathi drama now, in English

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.