दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘ग्रोप्ड’ची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 06:30 PM2023-12-24T18:30:01+5:302023-12-24T18:34:14+5:30

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘ग्रोप्ड’ची निवड झाली आहे.

Selection of 'Groped' at Dadasaheb Phalke International Film Festival | दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘ग्रोप्ड’ची निवड

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘ग्रोप्ड’ची निवड

छत्रपती संभाजीनगर येथील प्रथमेश सांजेकरचे लेखन आणि दिग्दर्शन असलेली ग्रोप्ड (Groped) या शॉर्ट मिल्मची निवड २०२४ दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलसाठी करण्यात आली आहे. जगातील ६० पेक्षा जास्त देशांमधून जवळपास १० हजार फिल्म या फेस्टिव्हलमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यापैकी पहिल्या १०० मध्ये ग्रोप्ड ची निवड झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील प्रथमेश सांजेकर याने पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गंत महाविद्यालयातून फिल्म मेकिंगचे शिक्षण घेतले. केवळ अभ्यास म्हणून नाही, तर आपण घडविणाऱ्या कलाकृतीला कौतुकाची थाप मिळून त्यातून सामाजिक संदेशही (social awareness) घराघरात पोहोचावा 
म्हणून प्रथमेश याने ग्रोप्ड लघुपटाची निर्मिती केली. या प्रयत्नाचे फळ त्याला मिळाले. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात २०२४(DPIFF) लघुचित्रपट श्रेणीत १० हजार फिल्मधून पहिल्या १०० मध्ये नामांकन मिळवण्याचा मान मिळाला आहे. 

लघुचित्रपटाविषयी प्रथमेश म्हणाला, 'सार्वजनिक ठिकाणी महिलांसोबत होणाऱ्या गैरवर्तन आणि सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या मनातील भावना या विषयावर आधारीत ग्रोप्ड लघुपट आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना हा विषय सुचला व तब्बल एका वर्ष अभ्यास केल्यानंतर पुणे शहरात याचे चित्रीकरण करण्यात आले आहे'. ग्रोप्ड या लघुपटाला यापुर्वी पुणे फिल्म फेस्टिवलमध्ये उत्कृष्ट लेखक व दिग्दर्शनसाठी प्रथमेश याला पुरस्कार देखील मिळालेला आहे. 

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये निवड झाल्यामुळे त्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. तसेच पुरस्कार मिळेल अशी अपेक्षा प्रथमेशने व्यक्त केली आहे. या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन प्रथमेश सांजेकर याने केले आहे. तर, डीओपी म्हणून देवांश भट्ट याने काम पाहिले आहे. यामध्ये मराठी कलाकार विकास हांडे, अश्विनी बागल आमि मंगेश पवार यांनी अभिनय केला आहे.

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न कायमच ऐरणीवर आलेला असतो. रेल्वे, बस किंवा गर्दीच्या ठिकाणी महिलांसोबत गैरवर्तन केल्याच्या अनेक घटना घडतात त्यासंदर्भात अनेक महिला विरोध करून आवाज उठवत तसेच  कायदेशीर कारवाई करतात किंवा त्या गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीला धडा शिकवतात. मात्र, अनेक महिला भीती किंवा इतर काही कारणांमुळे गैर वर्तनाला विरोध करू शकत नाहीत. त्यांच्या मनातील भावना काय असतात या विषयावर ग्रोप्ड लघुपट निर्मिती करण्यात आल्याचे प्रथमेश सांजेकर याने सांगितले.

Web Title: Selection of 'Groped' at Dadasaheb Phalke International Film Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.