आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘दंडित’ची निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2016 17:52 IST2016-09-10T12:22:21+5:302016-09-10T17:52:21+5:30
गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी पहूर येथील दिग्दर्शक कैलास माळी यांचा ‘दंडित’ चित्रपट दाखल होणार असून, त्यासाठी निवड करण्यात आली आहे. ...

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘दंडित’ची निवड
या चित्रपटात आदिवासी समाजाचे वास्तव, रूढी, परंपरा त्यांच्या व्यथा मांडण्यात आल्या आहेत. तसेच जात पंचायतीचे जुलमी अत्याचार आदिवासी समाजाला सहन करावा लागतात. यातून हतबल प्रशासन, पोलीस, कायदा याचेही दर्शन घडले आहे. मात्र एक शिक्षिका ज्ञानाचा सुरूंग पेरते आणि अहंकाराने उन्मत झालेली विचारसरणी स्फोटात उद्ध्वस्त होते. वर्षानुवर्षे चालत आलेल्या रूढी परंपरेचा कायमचा अस्त होतो आणि सुसंस्कृत विचारसरणीचा विजय होतो, अशी कथा दिग्दर्शक कैलास माळी यांनी चित्रपटात मांडली आहे.
२२ ते २८ नोव्हेंबर पणजी येथे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे दिग्दर्शक व या महोत्सवाचे ज्युरी शेखर कपूर यांच्या उपस्थितीत ‘दंडित’ चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे. पॅरोनाम विभागात याची निवड करण्यात आली आहे.