SEE PICS:ओळखलंत का आपण याला? हा आहे तुमचा राणा पूर्वी असा होता त्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2017 13:36 IST2017-05-08T07:28:21+5:302017-05-08T13:36:56+5:30

हा फोटो बघून तुम्हाला कदाचित हा अभिनेता कोण आहे याचा अंदाज नाही येणार पण हा आहे. तरूणींच्या गळ्यातला ताईत ...

SEE PICS: Do you know why? This is what your Rana had in the past | SEE PICS:ओळखलंत का आपण याला? हा आहे तुमचा राणा पूर्वी असा होता त्याचा अंदाज

SEE PICS:ओळखलंत का आपण याला? हा आहे तुमचा राणा पूर्वी असा होता त्याचा अंदाज

फोटो बघून तुम्हाला कदाचित हा अभिनेता कोण आहे याचा अंदाज नाही येणार पण हा आहे. तरूणींच्या गळ्यातला ताईत बनलेला 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील राणा ही भूमिका रंगवणारा हार्दिक जोशी.पूर्वी हार्दिक काहीसा असा दिसायचा. हा फोटो पाहिल्यावर तुम्हाला छोट्या पडद्यावर झळकणारा हा हार्दिकच आहे का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. कारण पूर्वीचा हार्दिकचा हा फोटो मोहक वाटत नाही. हार्दिकच्या आत्ताच्या लूकमध्ये आणि पूर्वीच्या लूकमध्ये कमालीचा फरक जाणवतोय. त्याने स्वत:च्या फिटनेसवरही खूप मेहनत घेतली. त्याच्या डॅशिंग लूकमुळे सगळ्यांची मनं जिंकण्यात तो यशस्वी ठरला आहे. 



ख-या अर्थाने  'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून हार्दिक प्रसिद्धीझोतात आला. राणा या भूमिकेच्या माध्यमातून हार्दिक आज घराघरांत पोहचला आहे.या मालिकेपूर्वी हार्दिक 'दुर्वा' या मालिकेत झळकला होता. या मालिकेत त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती.'स्वप्नांच्या पलिकडले' या मालिकेतही त्याने भूमिका साकारली होती.मात्र त्याने आजवर साकारलेल्या भूमिका रसिकांच्या मनावर ठसा उमटवण्यात अपयशी ठरल्या.



हार्दिकने छोट्या पडद्याप्रमाणेच मोठ्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. 'रंगा पतंगा' या सिनेमात तो झळकला होता. या सिनेमात त्याने साकारलेली खलनायकाच्या भूमिकेचे विशेष कौतुकही झाले होते. आता पुन्हा एकदा हार्दिक रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'जर्नी प्रेमाची' या मराठी सिनेमातून हार्दिक पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येणार आहे.विशेष म्हणजे या सिनेमातही तो खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सध्या त्याच्या अभिनयामुळेच त्याच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. त्यामुळे आगामी काळात वेगवेगळ्या भूमिकेत झळकणारा राणाचा अंदाज रसिकांच्या पसंतीस पात्र ठरेल यांत काही शंका नाही. 


 

Web Title: SEE PICS: Do you know why? This is what your Rana had in the past

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.