चैतन्यला मिळाली रोलेक्सकडून स्कॉलरशिप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2016 14:30 IST2016-07-04T09:00:00+5:302016-07-04T14:30:00+5:30

कोर्ट या चित्रपटाने ऑस्करपर्यंत मजल मारली होती. चैतन्य ताम्हाणेचा हा पहिला चित्रपट असूनही या चित्रपटाच्या त्याच्या दिग्दर्शनाचे सगळ्यांनीच कौतुक ...

Scholarship from Rolex received from Chaitanya | चैतन्यला मिळाली रोलेक्सकडून स्कॉलरशिप

चैतन्यला मिळाली रोलेक्सकडून स्कॉलरशिप

र्ट या चित्रपटाने ऑस्करपर्यंत मजल मारली होती. चैतन्य ताम्हाणेचा हा पहिला चित्रपट असूनही या चित्रपटाच्या त्याच्या दिग्दर्शनाचे सगळ्यांनीच कौतुक केले होते. चैतन्यला रोलेक्स मेन्टर अँड प्रोटेज आर्टस इनिशिएटिव्ह ही स्कॉलरशिप देण्यात आली आहे. या स्कॉलरशिप अंतर्गत त्याला प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक अल्फान्सो क्युरोन यांच्याकडून मार्गदर्शन घेता येणार आहे. या स्कॉलरशिपविषयी चैतन्य सांगतो, ही स्कॉलरशिप मिळवण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकत नाही, यासाठी तुम्हाला कोणीतरी निमंत्रण पाठवण्याची गरज असते. या निमंत्रणच्या प्रक्रियेत माझे सहा-सात महिने गेले. त्यानंतर 18 जणांची निवड करण्यात आली. अंतिम चार जणांना लंडनला बोलावण्यात आले. या चार जणांची मुलाखत अल्फान्सो यांनी घेतली आणि त्यातून माझी निवड झाली. आता मी अल्फान्सो यांची चित्रपट बनवण्याची प्रक्रिया काही काळापर्यंत तरी जवळून पाहू शकतो तसेच माझ्या पटकथांवर मी अल्फोन्सो यांच्याकडून टिप्स घेऊ शकतो. अल्फान्सो यांना भेटण्याचा, तिथे राहाण्याचा खर्च हा रोलेक्सकडून करण्यात येणार आहे. ऑक्टोबरमध्ये अल्फान्सो यांच्या नव्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार आहे. या चित्रीकरणाला चैतन्य जाणार आहे. अल्फान्सो हे अतिशय महान दिग्दर्शन असले तरी त्याचा त्यांना अजिबातच अभिमान नाहीये. अल्फान्सो यांना भारताविषयी प्रचंड प्रेम असून त्यांना संत ज्ञानेश्वर, तुकाराम या महाराष्ट्रातील संतांविषयी चांगलीच माहिती आहे. त्यांनी पंढरपूरलाही भेट दिली होती असे त्यांनी चैतन्याला सांगितले.  

Web Title: Scholarship from Rolex received from Chaitanya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.