वायझेड म्हणतायत, अरे कृष्णा...अरे कान्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 12:53 IST2016-06-22T07:23:08+5:302016-06-22T12:53:08+5:30
वाय झेड हे नाव ऐकुनच खरतर प्रत्येकाच्या भुवया उंचावतात. आता या शब्दाचा खरा ...
.jpg)
वायझेड म्हणतायत, अरे कृष्णा...अरे कान्हा
वाय झेड हे नाव ऐकुनच खरतर प्रत्येकाच्या भुवया उंचावतात. आता या शब्दाचा खरा अन नेमका अर्थ काय आहे याच्या तळाशी न गेलेलेच बरे. हा एक आगामी चित्रपट आहे ज्याचे नाव रिलिज झाल्यापासुनच चर्चेत असुन या चित्रपटात नेमके काय आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. काही दिवसांपुर्वी या सिनेमाच्या पोस्टर अन कलाकारांचे गुपित उगड झाले आहे. सई ताम्हणकर ही सध्याची मराठी इंडस्ट्रीतील हॉट अभिनेत्री या चित्रपटात आहे म्हटल्यावर नक्कीच काहीतरी वेगळे आपल्याला पहायला मिळणार अशा आशा सध्या पल्लवीत झाल्या आहेत. आता या चित्रपटातील एक गाणे खास संगीत दिनाच्या निमित्ताने लाँच करण्यात आले आहे.
अरे कृष्णा, अरे कान्हा हे गाणे नूकतेच सोशल साईट्सवर पहायला मिळत आहे. या गाण्याचे शब्द ऐकुन नक्की हे वाय झेड सिनेमातीलच गाणे आहे का असे देखील तुम्हाला वाटू शकते. पण हो हेच ते पहिले वहिले वायझेड मधील गाणे आहे. या गाण्याविषयी अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्याशी संवाद साधला असता तिने सीएनएक्सला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यु मध्ये या गाण्या विषयी सांगितले. सई म्हणाली, वायझेडचा अर्थ खरतर अॅटिट्युड असा आहे. पण तो कोण कसा घेईल हे सांगता येत नाही. चित्रपटाचे म्हणाल तर आताच अरे कृष्णा, अरे कान्हा हे गाणे रिलिज झाले आहे. त्यामुळे कोणालाच या चित्रपटात नक्की काय आहे अन तो कशावर भाष्य करतोय हे समजत नाहीये. एवढेच नाही तर हे गाणे श्रृती आठवले या गायिकेने गायले असल्याचे सईने सांगितले.
{{{{twitter_post_id####
}}}}https://t.co/MVLbqe2738
आपलं घर, गाव, कम्फर्ट झोन सोडून जाणाऱ्या प्रत्येकाला निघताना हेच वाटलं असेल... त्या प्रत्येकाच हे गाणं!! #arekrishna— Kshitij Patwardhan (@Kshitij_P) June 21, 2016