सायली की रिंकू; दोघींपैकी 'ही' अभिनेत्री आहे आकाशच्या सर्वात जास्त क्लोज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 11:22 IST2023-04-07T11:21:17+5:302023-04-07T11:22:07+5:30

Akash thosar: आकाश ठोसरसाठी दोघींपैकी 'ही' अभिनेत्री आहे सर्वात खास

sayali patil or rinku rajguru who is akash best co star actor choosed this actress | सायली की रिंकू; दोघींपैकी 'ही' अभिनेत्री आहे आकाशच्या सर्वात जास्त क्लोज

सायली की रिंकू; दोघींपैकी 'ही' अभिनेत्री आहे आकाशच्या सर्वात जास्त क्लोज

महाराष्ट्राला पहिल्याच सिनेमातून 'सैराट' (sairat) करणारा अभिनेता म्हणजे आकाश ठोसर (akash thosar). नागराज मंजुळे (nagraj manjule) यांच्या सिनेमातून नावारुपाला आलेला आकाश 'घर बंदूक बिरयानी' (ghar banduk biryani) या सिनेमामुळे सध्या चर्चेत येत आहे.  या सिनेमामध्ये आकाशने अभिनेत्री सायली पाटीलसोबत (sayali patil) स्क्रिन शेअर केली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या जोडीची विशेष चर्चा रंगत आहे. अलिकडेच या जोडीने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'लोकमत फिल्मी'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये आकाशने त्याच्या जवळची अभिनेत्री कोण हे सांगितलं.

'घर बंदूक बिरयानी'मध्ये आकाश आणि सायली यांनी एकत्र काम केल्यामुळे त्यांच्याविषयी अनेक चर्चांना उधाण आलं आहे. इतकंच नाही तर नेटकऱ्यांनी सायली आणि रिंकू ( rinku rajguru) या दोघींची तुलनादेखील करण्यास सुरुवात केली आहे. यात खासकरुन रिंकू आणि सायली या दोघींपैकी आकाशची बेस्टफ्रेंड वा को अॅक्ट्रेस कोणती असा प्रश्नही त्याला वारंवार विचारला जात आहे. याच प्रश्नाचं उत्तर आता आकाशने दिलं आहे.

आर्चीसाठी रिंकूऐवजी 'या' अभिनेत्रीची झाली होती निवड; एका कारणामुळे तिने गमावला सिनेमा

सहअभिनेत्री म्हणून रिंकूसोबत काम करायला आवडतं की सायलीसोबत? असा प्रश्न आकाशला विचारण्यात आला. त्यावर, दोघी सुद्धा चांगल्या अभिनेत्री आहेत. त्यामुळे दोघींसोबत काम करायला आवडतं असं उत्तरं आकाशने दिलं.

दरम्यान, आकाशचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घर बंदूर बिरयानी हा सिनेमा आज (७ एप्रिल) रोजी प्रदर्शित झाला असून या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करण्यात आलं होतं. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच सुपरिहट झाल्याचं सांगण्यात येतं.
 

Web Title: sayali patil or rinku rajguru who is akash best co star actor choosed this actress