‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी लवकरच करणार लग्न,रिलेशनशिपमध्ये असल्याचा केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 14:14 IST2019-06-17T14:10:01+5:302019-06-17T14:14:19+5:30
चित्रटसृष्टीत बऱ्याच जणांचं लग्न झालंय, काही जण एन्गेज आहेत तर काही जण आधीच रिलेशनशिपमध्ये आहेत.

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी लवकरच करणार लग्न,रिलेशनशिपमध्ये असल्याचा केला मोठा खुलासा
मराठमोळी अभिनेत्री आणि रसिकांची लाडकी अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी. विविध सिनेमात सोनालीनं वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. मध्यंतरीच्या काळात सोनालीचं अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ती रिलेशनशिपमध्ये असल्याचंही बोललं जात होतं. मात्र अशा चर्चा आणि अफवांमुळे सोनाली बरीच वैतागली आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनालीने या अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. “माझं अफेअर असतं तर ते मी का लपवू असं सोनालीने म्हटले आहे. मात्र यावेळी तिने रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला आहे. ही व्यक्ती चित्रपटसृष्टीतील आहे असं विचारलं असता तिने त्याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे. चित्रटसृष्टीत बऱ्याच जणांचं लग्न झालंय, काही जण एन्गेज आहेत तर काही जण आधीच रिलेशनशिपमध्ये आहेत.
ज्यावेळी योग्य वेळ येईल आणि पुढचं पाऊल टाकण्याची वेळ येईल त्यावेळी माझ्या जीवनातील त्या व्यक्तीबाबत खुलासा करेन असं सोनालीने म्हटले आहे. आधी एन्गेजमेंट होईल आणि मग लग्न होईल, त्याबाबत माहिती देईल असं सोनालीने सांगितले आहे. मात्र यासाठी सोनालीने कोणतीही वेळ ठरवलेली नाही.
करिअरबाबत गेल्या वर्षी सोनालीचा कोणताही चित्रपट रसिकांच्या भेटीला आलेला नाही. मात्र येत्या वर्षात तिचे ३ चित्रपट रिलीज होत आहेत. एका चित्रपटात ती किक बॉक्सिंग करताना दिसेल. तसंच एका ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या आणि राजकीयपटातही ती झळकणार आहे.