संतोष-कुशलचा स्ट्रगलर साला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2016 14:21 IST2016-05-16T08:51:25+5:302016-05-16T14:21:25+5:30

संपुर्ण महाराष्ट्राला पोट धरुन हसायला भाग पाडणारा अभिनेता अन विनोदी कलाकार म्हणजे कुशल बद्रिके, कुशलने आजपर्यंत अनेक शोज मधुन प्रेक्षकांना खळखळून हसविण्याचा प्रयत्न केला आहे.

Satisfaction-skilled strigler | संतोष-कुशलचा स्ट्रगलर साला

संतोष-कुशलचा स्ट्रगलर साला


/>              संपुर्ण महाराष्ट्राला पोट धरुन हसायला भाग पाडणारा अभिनेता अन विनोदी कलाकार म्हणजे कुशल बद्रिके, कुशलने आजपर्यंत अनेक शोज मधुन प्रेक्षकांना खळखळून हसविण्याचा प्रयत्न केला आहे. तर संतोष जुवेकरने चित्रपट अन मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची झलक दाखवून प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे. आता हे दोेघे जर एकत्र आले तर नक्कीच काहीतरी धमाल होणार यात वादच नाही. तुम्हाला वाटत असेल कि एखादा मस्त चित्रपट या दोघांच्या वाट्याला आला आहे का किंवा कोणत्या धमाल शो मध्ये यांचे दर्शन आपल्याला होणार का अ्से तर्क वितर्क लावले असतील तर ते साफ खोटे आहेत.  हे दोघे एकत्र येत आहेत ते कोणत्या चित्रपट, मालिकेसाठी नाही तर एका वेब सिरिज साठी. सध्या इंटरनेटवर वेब सिरिज पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. आता या दोघांच्या नव्या वेब सिरिजचे नेटवर कशा प्रकारे स्वागत होतय ते समजेलच आपल्याला. स्ट्रगलर साला या नावाची ही वेब सिरिज नक्कीच धमाल करेल यात शंका नाही. नावातच स्ट्रगलर असल्याने इंडस्ट्रीतील काही स्ट्रगलिंग कहाण्या आपल्याला यात पहायला मिळणार का असे वाटत आहे. संतोष-कुशलचा हा स्ट्रगलर साला प्रेक्षकांना किती अपील होतोय ते लवकरच समजेल.

 

Web Title: Satisfaction-skilled strigler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.