साडी नेसायला फार आवडते
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 06:03 IST2016-01-16T01:11:45+5:302016-02-06T06:03:24+5:30
'जोगवा', '७२ मैल-एक प्रवास', 'बायोस्कोप'मधील बैल या लघुपटात विशेष ठसा उमटवलेली आणि आजच प्रदर्शित झालेल्या 'परतु' चित्रपटात एक वेगळीच ...

साडी नेसायला फार आवडते
' ;जोगवा', '७२ मैल-एक प्रवास', 'बायोस्कोप'मधील बैल या लघुपटात विशेष ठसा उमटवलेली आणि आजच प्रदर्शित झालेल्या 'परतु' चित्रपटात एक वेगळीच भूमिका साकारलेली अभिनेत्री म्हणजे स्मिता तांबे. स्मिता तिच्या फॅशन स्टाईलबद्दल सांगते, मला साडी नेसायला.. विशेषकरून पारंपरिक साडी नेसायला प्रचंड आवडते आणि त्यातही कांजिवरम् साडी नेसणे मी अधिक पसंत करते. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमामध्ये किंवा इतर वेळीसुद्धा मला साडी नेसायला फार आवडते. त्याच्याशिवाय इंडो-वेस्टर्नपण मला जे कम्फर्टेबल वाटेल, असे कपडे घालण्यास मी प्राधान्य देते.