'मनसू मल्लिगे'ची सैराट गाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 17:53 IST2017-02-20T12:23:34+5:302017-02-20T17:53:34+5:30

 नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. या चित्रपटाच्या यशाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली ...

Sareat songs of 'Manasu Mallige' | 'मनसू मल्लिगे'ची सैराट गाणी

'मनसू मल्लिगे'ची सैराट गाणी

 
ागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. या चित्रपटाच्या यशाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. यातील गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडली असल्याचे दिसत आहे. आता कन्नड रिमेकचे गाणेदेखील सैराटमय झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. या गाण्यांना सोशलमीडियावर तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सैराट झालं जी', 'याड लागलं', 'आत्ताच बया का बावरलं', आणि 'झिंग झिंग झिंगाट' ही 'सैराट'मधील ही लोकप्रिय गाणी आता कन्नड 'सैराट'चा रिमेक 'मनसू मल्लिगे'मध्ये देखील प्रेक्षकांना ऐकण्यास मिळणार आहे. विशेष म्हणजे याचे गायन आणि संगीत अजय - अतुल गोगावले यांचेच आहे. शिवाय एक वेगळे गाणेही यामध्ये पाहायला मिळणार आहे. कन्नड संगीतकार के. कल्याण यांनी हे गाणे संगीतबध्द केले असून सोनू निगम यांनी हे गाणे गायिले आहे.
     
    'सैराट'मधील 'याड लागलं' हे गाणे कन्नडमध्ये गीतकार डॉ. नागेंद्र प्रसाद यांनी लिहिले असून याचे बोल 'यारे नीऊ पारीवाला' असे आहेत. अजय गोगावलेच्या आवाजात हे कन्नड गाणे ध्वनिमुद्रीत करण्यात आले आहे. 'सैराट'मधेल दुसरे लोकप्रिय गाणे म्हणजे रिंकू राजगुरुवर चित्रीत करण्यात आलेले 'आताच बया का बावरलं'. हे गाणे श्रेया घोषालने गायिले होते. कन्नडचे गाणेदेखील श्रेयानेच गायिले आहे. कवीराज यांनी हे गाणे कन्नडसाठी अनुवादीत केले आहे.
     
       'सैराट'मधील सर्वात लोकप्रिय ठरलेले 'झिंगाट' हे गाणे गीतकार योगराज भट्ट यांनी लिहिले आहे. सर्वच गाण्यात अजय अतुलच्या संगीताचा बाज तसाच ठेवण्यात आला असून केवळ कन्नड भाषेत ही गाणी तयार झाली आहेत. 'मनसू मल्लिगे' चित्रपटाची कर्नाटकात जबरदस्त उत्सुकता प्रेक्षकांच्यात लागली असून चित्रपटातील गाण्यांना जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: Sareat songs of 'Manasu Mallige'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.